Advertisement

Ashadhi Wari:  पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांसाठी शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. टोलमाफीचे स्टीकर्स हे पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्यांमधून देण्यात येणार आहे.

आषाढी वारीसाठी पांढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकासाठी, वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांच्या वाहनाांना टोल माफ करण्याबाबत राज्य सरकारने 1 जून 2023 रोजी निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम विभागाने टोलमाफीबाबतचे आदेश जारी केले आहेत. गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स पुरवण्याचे निर्देश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.

आजपासून टोलमाफीचे स्टीकर्स मिळणार

पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक वारकऱ्याांना “आषाढी एकादशी 2023”, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येने नुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस, सांबांधीत आर.टी.ओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या, आरटीओमध्ये आजपासून अर्थात 13 जून पासून टोलमाफीचे स्टीकर्स उपलब्ध होणार आहेत.

कधीपर्यंत सवलत?

पंढरपूरला जाताना आणि पुन्हा पंढरपूरवरून येताना 13 जून 2023 पासून ते 3 जुलै 2023 पर्यंच टोलमाफीची सवलत लागू असणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. ही सवलत पालखी, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या जड व वाहनांसाठीच असणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्ताने असणाऱ्या पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने टोल नाक्यावर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवण्याचू सूचना करण्यात आली आहे. त्याशिवाय, परिवहन विभागालादेखील जादा बसेस सोडण्यास सांगण्यात आले आहे.

खड्डे बुजवण्याचे निर्देश

महाराष्ट्रभरातून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील खड्डे भरणे, दुरुस्ती करणे, सूचना फलक लावणे आदी कामे पूर्ण करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.

महाराष्ट्र राज्यातून पांढरपूरकडे येणारे सर्व टोल नाक्यांवर उपरोक्त कालावधीत टोल माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामांडळाच्या बसेसना टोलमधून सूट द्यावी, असे ठरले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गरजेप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्याकडून टोल माफीसाठीचे कूपन, पास घ्याव असे आवाहन करण्यात आले आहे.

आषाढीला येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीकडून 15 लाख लाडू

आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाच्या प्रसाद म्हणून अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झालेल्या बुंदीच्या लाडूला भाविकांतून असलेली मागणी पाहून या वर्षी मंदिर समितीने 15 लाख लाडू बनविण्यास सुरुवात केली आहे. यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरण्याचे संकेत पाहता गरज पडल्यास आणखी 5 लाख लाडू बनविण्याची तयारी केल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून विठुरायाच्या प्रसाद म्हणून हा बुंदीचा लाडू भाविक यात्रेनंतर आपल्या गावाकडे घेऊन जात असतो. तसे पाहता विठुरायाच्या भक्तांना आषाढी यात्रा ही दिवाळी पेक्षा वेगळी नसते आणि त्यामुळेच मंदिर समितीच्या लाडू प्रसादाला या भाविकांतून मोठी मागणी असते.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ashadhi Wari 2023: पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफ; आजपासून स्टीकर्स मिळणार, जाणून घ्या सर्व माहितीhttps://ift.tt/qErOTLo
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ashadhi Wari 2023: पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफ; आजपासून स्टीकर्स मिळणार, जाणून घ्या सर्व माहितीhttps://ift.tt/qErOTLo