Advertisement

Sant Nivruttinath Palkhi : 'जाईन ग माये तया पंढरपुरा, जाईन न गं माये तया पंढरपुरा' भेटेन माहेरा आपुलीया..., माझे, माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी', अशा असंख्य अभंगांनी पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) अहमदनगर जिल्ह्यात असून श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाली आहे. कालच्या साकत गावातील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी बीड शहरात दाखल झाली असून काल बीड येथील मुक्कामानंतर आजही शहरातील बालाजी मंदिरात मुक्कामी असणार आहे.

गेल्या चौदा दिवसांपासून पंढरपूरला (Pandharpur) विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्याचे प्रस्थान झाले असून लाखो भाविक पायी वारी करीत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा पंधरावा दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करुन दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. संत निवृत्तीनाथांची पालखी नगर जिल्ह्यात असून जामखेड तालुक्यातील साकत येथील मुक्कामानंतर नाथांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.

राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरुन दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरु असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल बीड शहरात मुक्कामी होती. आज पालखीचा पंधरावा दिवस असून आजही पालखी बीड शहरातच विसावणार आहे. दुपारी बीड शहरातील ग्रामस्थांकडून दुपारचे जेवण दिले जाणार असून त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी याच मार्गाने पुढे बीड शहरातील बालाजी मंदिराकडे मार्गस्थ होणार असून याच ठिकाणी विसावा घेणार आहे.

आज पालख्यांचा मुक्काम कुठे?

संत निवृत्तीनाथांची पालखी आज अहमदनगर जिल्ह्याच्या शेवटच्या सीमेवर पोहोचली असून आज श्रींगोदा तालुक्यात प्रवेश केला आहे. पुढे मार्गक्रमण करत वाटेफळ गावातून पुढे सरकत रुई, अंबिलवाडी, बनपिंपरी मार्गे घोगरगावी मुक्कामाला जाणार आहे. संत मुक्ताबाईंची पालखी आज बीड शहरात असून आजचा दिवसही बीड शहरात नाम संकीर्तन सोहळा पार पडणार आहे. दुपारी बीड शहरवासियांकडून दिंडीला दुपारचे जेवण दिले जाणार आहे. त्यांनतर संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यात आज संध्याकाळी पालखी तळ बीड शहरातील बालाजी मंदिर येथे होणार असून या ठिकाणी समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार आहे.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी आज श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगावी मुक्कामी, तर मुक्ताबाईंची पालखी बीड शहरात विसावणार https://ift.tt/7SYvr0I
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी आज श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगावी मुक्कामी, तर मुक्ताबाईंची पालखी बीड शहरात विसावणार https://ift.tt/7SYvr0I