Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २२ जून, २०२३, जून २२, २०२३ WIB
Last Updated 2023-06-22T07:49:44Z
careerLifeStyleResults

Beauty Tips : पपलस करड तवच यसरखय समसयन तरसत आहत? मग 'ह' 7 उपय करन पह

Advertisement

<a href="https://ift.tt/YKs9ZmS Skin Secrets : आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ग्लोईंग आणि डागरहित त्वचा (Skin) प्रत्येकालाच हवी असते, मग ती स्त्री असो वा पुरुष. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवणं फार काही कष्टाचं काम नाही. यासाठी तुम्हाला महागड्या क्रीम किंवा इतर कोणतीही खास ट्रीटमेट घेण्याचीही गरज नाही. काही नियमित आणि सोप्या आरोग्यदायी सवयींमुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येऊन तुमची त्वचा तजेलदार होईल. पिंपल्स, ड्राय स्किन, काळवंडलेली त्वचा अशा वेगवेगळ्या समस्यांपासून त्रस्त असाल, तर येथे दिलेल 7 उपाय करून पाहा. हे सोपे उपाय नियमित केल्यास तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

भरपूर पाणी प्या

तुमची त्वचा हायड्रेट तर चेहऱ्यावर आपोआप ग्लो येऊन तुम्ही सुंदर दिसता. त्यामुळे भरपूर पाणी पिऊन चेहरा हायड्रेट ठेवा. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल आणि मुरुमांची समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्या.

व्यायाम करा

व्यायाम केल्यानेही तुमची त्वचा चमकदार होते. व्यायाम केल्याने रक्ताभिसरण योग्यप्रकारे होते. यामुळे त्वचेच्या मृत पेशींना जीवदान मिळते आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसतो.

ताणतणाव दूर करा

सुंदर आणि ग्लोईंग त्वचा हवी असेल तर ताणतणाव दूर करा. तुम्ही तणाव घेतल्यास त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊन चेहरा कोमजल्यप्रमाणे दिसतो. त्यामुळे स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी ठेवा, यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होईल.

पोषक आहार घ्या

सुंदर दिसण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार घेणं आवश्यक आहे. तुमच्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. तेलकट आणि फास्ट फूड खाणं टाळा. त्याऐवजी प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट युक्त अन्न खाल्ल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल.

पुरेशी झोप घ्या

त्वचा दुरुस्त करण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे किमान सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या, यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. डार्क सर्कलची समस्याही दूर होऊन तुमचा चेहरा चमकदार होईल.

त्वचेची काळजी घ्या

सुंदर दिसण्यासाठी, त्वचेची चांगली निगा राखणंही गरजेच आहे. यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. दर आठवड्याला स्कीन एक्सफोलिएट करण्यासाठी स्क्रब करा. चेहऱ्यावर मुलतानी माती, बेसन आणि टोमॅटोचा रस यासारख्या नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेला मास्क लावा.

सनस्क्रीन वापरा

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी नेहमी सनस्क्रीन वापरा. यासाठी 30 किंवा त्याहून जास्त SPF असलेली सनस्क्रीन वापरा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/3BHGP6n Growling : सावधान! पोटातून गुडगुड आवाज येतोय? याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाहीतर...

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Beauty Tips : पिंपल्स, कोरडी त्वचा यासारख्या समस्यांनी त्रस्त आहात? मग 'हे' 7 उपाय करुन पाहाhttps://ift.tt/6GDHCd2