Advertisement

Bread and Health:  अनेक घरांमध्ये ब्रेड हा आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ऑफिससाठी जेवणाचा डबा असो किंवा मुलांच्या शाळेचा टिफिन, त्यासाठी ब्रेडला प्राधान्य दिले जात आहे काही लोक फक्त घरी शिजवलेले अन्न देण्यास प्राधान्य देतात. तर, दुसरीकडे, काही लोकांच्या मते, ब्रेड हा हलका नाश्ता असून आणि सहज पचतो. ब्रेड हा आपल्या आधुनिक जीवनशैलीचा दिवसेंदिवस इतका महत्त्वाचा भाग बनला आहे की तो कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होतो. काही लोकांना वाटते की ब्रेडमध्ये कमी कार्बोहायड्रेट असते त्यामुळे ते आरोग्यास हानी पोहोचवत नाही पण हे खरे आहे का? ब्रेड खाणे आरोग्यासाठी चांगले आहे की नाही?

उपाशी पोटी खाऊ नये ब्रेड

बाजारापासून घराघरात अनेक प्रकारचे समज-गैरसमज पसरले आहेत. कमी किंमतीमुळे ब्रेड हे अनेकांसाठी जेवणाचा महत्त्वाचा घटक, खाद्यपदार्थ असू शकतो. ग्रेन्स फूड फाउंडेशनच्या ( Grains Food Foundation) मते, ब्रेडमध्ये फोलेट, फायबर, लोह, बी जीवनसत्त्वे आणि बरेच काही घटक असतात. पण रिकाम्या पोटी फक्त ब्रेड खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण तुम्ही ब्रेड हे एकदमच आरोग्यासाठी वाईट आहे, असे म्हणू शकत नाही.
अनेक आहारतज्ज्ञ, नाश्त्यात ब्रेडचा समावेश करण्यास सांगतात. पण व्हाईट ब्रेड ऐवजी मल्टी-ग्रेन ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेडचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

ब्रेडमध्ये असतात हे घटक

कॅलरीज: 82
प्रथिने: 4 ग्रॅम
एकूण चरबी: 1 ग्रॅम
चरबी: 0 ग्रॅम
कार्बोहायड्रेट: 14 ग्रॅम
फायबर: 2 ग्रॅम
साखर: 1 ग्रॅम

रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्ल्यामुळे होईल हे नुकसान

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता

रोज रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने साखरेची पातळी खूप वाढू शकते. त्याचा हाय ग्लायसेमिक इंडेक्स तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो. ब्रेडमध्ये अमायलोपेक्टिन ए असते. ज्यामुळे साखरेची पातळी वाढते. उपाशी पोटी ब्रेड दररोज खाल्ल्याने मधुमेह, किडनी स्टोन आणि हृदयविकारही होऊ शकतो.

वाईट कोलेस्ट्रॉल वाढवते

व्हिटॅमिन ई आणि फायबर चे प्रमाण ब्रेडमध्ये फारच कमी असतात. त्यामुळे रोज खाल्ल्यास शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

वजन वाढू शकते

दररोज ब्रेड खाल्ल्याने शरीराचे वजन वाढू लागते. याची सुरुवात तुम्हाला प्रथम बद्धकोष्ठतेपासून होते. पुढे जाऊन, चयापचय कमी होईल. त्यानंतर शरीरात प्रोटीन आणि फॅट जमा होण्यास सुरुवात होते आणि कार्बोहायड्रेट साखरेमध्ये बदलणे सुरू होईल. यामुळे वजन वाढू लागते. व्हाईट ब्रेडमुळे हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे.

(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. कोणत्याही उपचारासाठी, डाएटसाठी आहारतज्ज्ञ, डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.)

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Bread and Health: दररोज उपाशी पोटी ब्रेड खाताय? शरीराला होईल नुकसान, नकळत जडतील आजारhttps://ift.tt/qErOTLo
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Bread and Health: दररोज उपाशी पोटी ब्रेड खाताय? शरीराला होईल नुकसान, नकळत जडतील आजारhttps://ift.tt/qErOTLo