Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ६ जून, २०२३, जून ०६, २०२३ WIB
Last Updated 2023-06-06T12:49:02Z
careerLifeStyleResults

Edema Symptoms : सारखी सूज येतेय? मग दु्र्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं, जाणून घ्या काय आहे हा आजार

Advertisement

Edema Symptoms : सध्याचं जीवन हे धावपळीचं आहे. यासोबत लोकांच्या जीवनशैलीमध्ये प्रचंड बदल झाला आहे. यामुळे आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक आजार बळावतात. याचा आपल्या शरीरावर परिणाम दिसून येतो. एडिमा (Edema Symptoms) हा असा आजार आहे सुरूवातीला बरेचजण दुर्लक्ष करतात. यामध्ये सुरूवातीला हाताला, घोट्याला आणि पायाला सुज होते. याचं कारण तुमच्या शरीरात काही तरी बदल होत आहेत. यासाठी  या चार वैद्यकीय कारणास्तव तुमचे हात आणि पाय सुजू शकतात. तुमच्या किडनीमध्ये काही समस्या असेल, तर हात-पाय सुजतात. दुसरे अशुद्ध रक्ताभिसरण आहे. तिसरे जर तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला असेल, तर हात आणि पाय सुजू शकतात. बऱ्याच वेळा शरीरातील सोडियमची पातळी वाढल्यामुळे हाता-पायांना सूज येते. याशिवाय संपूर्ण शरीरात सूज होऊ शकते. आदी प्रकारची ही सर्व लक्षणं एडिमाच्या आजाराची आहेत. एडिमा आजाराचे नेमके प्रकार कोणते? याची कोणती लक्षणे आहेत? याविषयी सविस्तर माहिती घेऊया...

एडिमा आजाराचे प्रकार :

एडिमा हा अत्यंत धोकादायक आजार आहे. यामुळे शरीरात द्रव पदार्थासारखा एक थर जमा होतो. याला वैद्यकीय भाषेत फ्लूइड रिटेंशन (Fluid Retention) असं  म्हणतात.

1. पेरिफेरल एडिमा :

एकदा एडिमा झाल्यानंतर शरीरातील काही भागात त्रास सुरू होतो. यामध्ये  हाताला, घोट्याला आणि पायाला सुज येते आणि शरीरात द्रव पदार्थासारखा एक थर जमा व्हायला सुरूवात होते. यामुळे संपूर्ण शरीर सुजते.

2. पल्मोनरी एडिमा :

या आजारामुळे फुफ्फुसात पाणी जमा होते. यामुळे व्यक्तीला श्वास घेताना समस्या येते.अशी लक्षणे दिसून येत असतील, तर त्वरीत डॉक्टारांची भेट घ्या.

3. सेरेब्रल एडिमा :

सेरेब्रल एडिमाच्या आजारानं पीडित व्यक्तीच्या मेंदूत पाणी भरायला सुरूवात होते. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे.

4.मॅक्युलर एडिमा :

या प्रकारचा आजार मधुमेही रूग्णांमध्ये आढळून येतो. यामुळे रूग्णाचे डोळे सूजतात.

या कारणामुळे होतो एडिमा :

1. चुकीच्या जीवशैलीचा अवलंब केल्यामुळेही एडिमा होऊ शकतो. यामध्ये शरीरातील रक्त वाहिन्यांच्या नसांमध्ये लीकेज तयार होतात. यामुळे शरीरात द्रव पदार्थासारखा थर जमा होतो. यामुळे शरीर सुजते.
2. जर शरीरातील सोडियमची पातळी वाढल्यामुळेही शरीरात सूज येते.
3. किडनीच कार्यात समस्या निर्माण झाल्यामुळेही शरीरात सूज येते.
4. लठ्ठपणा वाढल्यामुळे एडिमा होऊ शकतो.
5. दीर्घकाळ एकाचा पोझिशनमध्ये बसून राहणं किंवा उभं राहणं यामुळेही हा आजार होतो.
6. अशुद्ध रक्ताभिसरणामुळेही एडिमा होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

इतर बातम्या वाचा :

<a href="https://ift.tt/ZCuUHPi Symptoms : लाँग कोविड रुग्णांमध्ये नवीन लक्षण, माणसांचे चेहरे ओळखण्यात अडचण

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Edema Symptoms : सारखी सूज येतेय? मग दु्र्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं, जाणून घ्या काय आहे हा आजारhttps://ift.tt/LetuAFU