Advertisement
Sleep Quality : पुरेशी झोप (Sleep) घेणे ही प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते. शरीराला आवश्यक तेवढी झोप नियमीत घेणे गरजेचे आहे. चांगल्या झोपेमुळे आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. संपूर्ण 7-8 तासांची झोपमुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होते. झोपेवर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की काही खाद्यपदार्थ आपले झोपेचे रूटिन बिघडवतात. संशोधकांना असे आढळून आले की चांगले अन्न आणि खराब अन्न आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करते. म्हणूनच नेहमी चांगल्या अन्नाचे सेवन केले पाहीजे.
खराब आहारामुळे झोपेवर होऊ शकतो परिणाम
जर्नल ओबेसिटीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात सामान्य वजनाच्या 15 निरोगी तरुणांना एकत्रित केले गेले. या निरोगी तरूणांना वेगवेगळ्या प्रकारचे अन्न दिले गेले. यानंतर त्यांच्या झोपण्याच्या सवयी तपासण्यात आल्या. एका आहारात मोठ्या प्रमाणात साखर , फॅट्स आणि जंक फूड या पदार्थांचा समावेश होता तर दुसऱ्या आहारात सर्व सकस आणि आरोग्यास फायदेशीर असणाऱ्या पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. देण्यात आलेल्या दोन्ही आहारात कॅलरींचे प्रमाण समान होते. प्रत्येक आहारानंतर सहभागी झालेल्या तरूणांच्या झोपेची क्लिनिकल चाचणी केली गेली. झोपेच्या वेळी त्यांच्या मेंदूच्या होणाऱ्या एक्टिविटीजचे निरीक्षण केले गेले. यानंतर या सर्व 15 तरुणांना रात्रभर जागे ठेवण्यात आले. यानंतर त्यांची झोप चाचणी करण्यात आली.
खराब आहारामुळे बिघडते झोप
चाचणी केलेल्या लोकांच्या झोपेच्या गुणवत्तेत लक्षणीय फरक आढळून आला. जंक फूड (Junk Food) खाणाऱ्यांची गाढ झोप हेल्दी डाएट करणाऱ्यांच्या झोपे इतकी चांगली नव्हती. यावरून असे दिसून आले की झोपेच्या गुणवत्तेवर अन्नाचा परिणाम होतो. या संशोधनात असे आढळून आले की आहार आणि झोपेची गुणवत्ता यांचा संबंध आहे. जंक फूड खाल्ल्यानंतर झोप कमी होऊ शकते. आहारात सुधारणा करून तुम्ही झोप सुधारू शकता.
चांगल्या झोपेसाठी फाॅलो करा या टिप्स
चांगला आहार
चांगला आणि पोषक आहार झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतो. त्यामुळे रोजच्या आहारात शरीराला आवश्यक असतील तेवढे प्रोटीन , व्हिटामीन , लोह इत्यादींचा समावेश करावा. रात्रीच्या वेळी
चहा , काॅफी पिणे टाळावे.
नियमीत व्यायाम
नियमीत योगा केल्यास चांगली झोप येते. रोज व्यायाम केल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.
'या' पदार्थांच्या सेवनाने सुधारेल झोपेची गुणवत्ता
इतर महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/EYOkCaW Of Alcohol : सावधान ! दारूचे अतिसेवन ठरू शकते तुमच्या मेंदूला घातक; जाणून घ्या
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Good Diet For Sleep : खाण्यापिण्याच्या 'या' सवयींमुळे तुमची झोप होऊ शकते खराब, वाचा सविस्तरhttps://ift.tt/pgxZ3fz
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Good Diet For Sleep : खाण्यापिण्याच्या 'या' सवयींमुळे तुमची झोप होऊ शकते खराब, वाचा सविस्तरhttps://ift.tt/pgxZ3fz