Advertisement

Health Tips: वजन कमी करण्यसाठी अनेकजण भात खाणं सोडतात तर काहीजण वजन वाढू नये म्हणून ब्राऊन राईस खातात. तसा, भात हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा आहार आहे आणि भारतात भात अनेक प्रकारे बनवला जातो. तांदळापासून विविध प्रकारच्या गोष्टी बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात. पण जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा मात्र लोक आधी भात खाणं बंद करण्याचा सल्ला देतात. भात खाल्याने खरंच वजन वाढतं का? हे आज जाणून घेऊया.

भात खाल्ल्याने वजन वाढतं असा अनेकांचा समज आहे, त्यामुळे अनेकजण एकतर भात कमी खातात किंवा भात खाणंच सोडून देतात. तांदूळ हा आपल्या आहाराचा एक अत्यावश्यक भाग आहे. तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा समृद्ध स्रोत आहे. बर्‍याचदा लोक भाताचा संबंध लठ्ठपणाशी जोडतात, पण ते शास्त्रीयदृष्ट्या पूर्णपणे बरोबर नाही. तांदळामध्ये शरीराला फिट ठेवणारे अनेक घटक असतात. संशोधनानुसार, जर आपण संतुलित आणि पौष्टिक आहाराचा विचार केला तर भात हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. भात हा कमी चरबी, कमी साखर, ग्लूटेनमुक्त आणि ब जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. तसेच त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅगनीज आणि लोह यासारखे घटक देखील आहेत.

वजन वाढणं हे अन्न कसं शिजवलं जातं आणि अन्न किती प्रमाणात खाल्लं जातं, यावर अवलंबून असतं. आहारातील सर्व खाद्यपदार्थांमुळे आरोग्याला एक प्रकारे फायदा होतो, परंतु चुकीचं प्रमाण लाभाऐवजी नुकसानास कारणीभूत ठरू शकतं. अनेकदा भात बनवताना किंवा फ्राय करताना जास्त तेल किंवा तुप टाकलं जातं आणि त्यामुळे त्यातल्या कॅलरीजचं प्रमाण वाढून लठ्ठपणा येऊ शकतो. म्हणूनच तुमच्या शरीराच्या गरजेनुसार भात खाणं आणि कमी तेल, तुप वापरणं हे वजन नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचं आहे.

भात हा भाज्यांसोबत कमी प्रमाणात खाल्ला तर तुम्हाला अनेक फायदे होतात. जर तुम्ही रोज तूप, तेल, लोणी यांसारख्या पदार्थांसोबत भात खात असाल तर त्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं, म्हणूनच भात नुसता उकळून आणि भाज्यांसोबत खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. भात तयार करताना त्यात इतर डाळी टाकून खिचडी बनवली, तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं, त्यामुळे आहारात कमी प्रमाणात कॅलरीज घेतल्या जातात.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/rV8JXip Tips: 'हे' आहेत डाळिंब खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; अनेक आजाराच्या समस्या होतील दूर

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Facts: भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या...https://ift.tt/CDQfwgy
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Facts: भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या...https://ift.tt/CDQfwgy