Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २९ जून, २०२३, जून २९, २०२३ WIB
Last Updated 2023-06-29T00:48:45Z
careerLifeStyleResults

Health Tips : पवसळयत वरवर गलवर खज क यत? जणन घय यमगच खर करण

Advertisement

Mansoon Skin Care Tips : अनेक वेळा असे होते की गालावर खाज सुटते पण अनेक प्रयत्न करूनही खाज काही सुटत नाही. ही समस्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास देऊ शकते. कधीकधी ही खाज स्वतःच बरी होते, परंतु काहीवेळा ती इतकी वाढते की तुम्हाला त्यामुळे अस्वस्थ वाटू शकते. गालावर खाज येणे कोणत्याही ऋतूत होऊ शकते, परंतु पावसाळ्यात ही समस्या अधिक दिसून येते. गालावर सतत खाज येत असल्याने तुम्हाला अनेक आजारही होऊ शकतात. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचे आहे. गालावर खाज येण्याचे नेमकं कारण काय असू शकते हे जाणून घेऊयात.

1. सूर्यप्रकाश

गालावर सतत खाज येण्याच्या समस्येचे कारण सूर्यप्रकाश देखील असू शकतो. उन्हात जाण्यामुळे किंवा जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळे अनेकदा सनबर्न होतो, जे खाज येण्याचे कारण असू शकते. त्यामुळे जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर गाल थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात न येण्याचा प्रयत्न करा.

2. चुकीची उत्पादने वापरल्यास खाज येते

गालावर खाज येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीच्या स्किन केअर उत्पादनांचा वापर. अनेक वेळा असे घडते की, लोक विचार न करता मेकअप उत्पादने खरेदी करतात, ज्यामुळे त्यांना ऍलर्जीचा त्रास होतो. आणि गालावर खाज सुटते. म्हणूनच कोणतेही नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी, त्याची पॅच चाचणी करा जेणेकरून तुम्हाला ऍलर्जी टाळता येईल.  तुमच्या त्वचेनुसार उत्पादन निवडा.

3. अस्वच्छपणा

कधी-कधी चेहरा व्यवस्थित साफ न केल्यामुळे खाज येण्याची समस्या होऊ शकते. विशेषत: पुरुषांनी मोठी दाढी ठेवली आणि ती व्यवस्थित साफ केली नाही तर खाज सुटू लागते. अशा परिस्थितीत चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेस वॉश वापरण्याचा प्रयत्न करा. महिलांनी मेकअप काढण्यासाठी थेट फेसवॉश वापरणे टाळावे कारण मेक-अपचे छोटे कण त्वचेत घुसून संसर्ग होऊ शकतात. चेहरा धुण्याऐवजी तुम्ही गुलाबपाणी किंवा टोनर वापरू शकता.

4. सोरायसिस रोग

अनेक वेळा आपण गालावर खाज येण्याची समस्या सामान्य म्हणून सोडतो, परंतु हे सोरायसिस सारख्या त्वचेच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. अशा स्थितीत गालावर खाज येण्याच्या समस्येसोबतच लाल पुरळ सुद्धा दिसू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवा कारण हा आजार टाळल्यास तो वाढू शकतो.

5. अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी

ही एक प्रकारची त्वचेची ऍलर्जी आहे ज्यामध्ये त्वचेवर पुरळ उठते आणि खाज सुटते. तसेच, हा आजार काही दिवसांत स्वतःच बरा होतो, परंतु अशी समस्या उद्भवल्यास, डॉक्टरांना नक्कीच दाखवा.

गालावर खाज येऊ नये म्हणून त्वचा हायड्रेट ठेवा. कोरड्या त्वचेमुळे देखील खाज येण्याची समस्या उद्भवते. त्वचेच्या उत्पादनांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक निवडा. मेकअप ब्रश नियमितपणे स्वच्छ करा. गालावर खाज येण्याची समस्या वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/fxoHlYT Tips : फिट राहण्यासाठी फक्त जॉगिंग नाही...'रिव्हर्स वॉकिंग'सुद्धा फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : पावसाळ्यात वारंवार गालावर खाज का येते? जाणून घ्या यामागचं खरं कारणhttps://ift.tt/OQEXRbo