Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १९ जून, २०२३, जून १९, २०२३ WIB
Last Updated 2023-06-19T11:49:09Z
careerLifeStyleResults

Heatstroke: जसत पण पऊन फयद नह; उषमघत टळयच असल तर करवय लगतल 'य' गषट!

Advertisement

<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/yv7XsqH Wave Alert : उत्तर भारतात खूप उष्णता आहे. तापमानाचा पारा इतका वाढला आहे की जणू सूर्य आग ओकत आहे. यूपीमध्ये उष्माघाताने अनेकांचा जीव घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. यूपीच्या बलियामध्ये वाढत्या तापमानामुळे आणि उष्माघातामुळे तीन दिवसांत 54 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाटणामध्ये 35 जणांचा मृत्यू झाला आहे.

उष्माघातामुळे रुग्णालयांमध्ये उलट्या, जुलाब, बेशुद्धी, बीपीची समस्या अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी उष्माघात आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव करणं खूप गरजेचं आहे. या काही गोष्टींमुळे तुम्हाला उष्माघात टाळता येईल.

उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?

1. उष्माघात टाळण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे, परंतु केवळ पाणी पिऊन तुम्ही उष्माघात टाळू शकत नाही, यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोलाईट पावडर/पेय, लिंबू पाणी, ताज्या फळांचा रस पिणं आवश्यक आहे. दुसरीकडे, जेव्हाही तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा भरपूर पाणी प्या आणि फळांचा रस किंवा ओआरएस सोबत ठेवा. ही पेयं तुम्ही वेळोवेळी पिऊन स्वत:ला उष्माघातापासून सुरक्षित ठेवू शकता. उन्हातून घरी परतल्यावर द्रवाची कमतरता भरुन काढण्यासाठी फक्त साध्या पाण्यावर अवलंबून राहू नका, सोबत थंड दूध, नारळपाणी, कैरीचं पन्हे, शिकंजीसारखे पेय प्यावे.

2. सनस्ट्रोकपासून सुरक्षित राहण्यासाठी, जेव्हा तुम्ही उन्हातून घरी परतता तेव्हा थंड ठिकाणी झोपा, जास्त चालू नका. शरीर नॉर्मल होऊ द्या, त्यानंतर हवेत जा किंवा आंघोळ करा.

3. उष्माघात टाळण्यासाठी कडक उन्हात बाहेर जाणं टाळणं सर्वात महत्त्वाचं आहे. कोणतेही तातडीचे काम असल्यास, सकाळी 10 च्या आधी घर सोडा आणि सूर्य डोक्यावर येण्यापूर्वी आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. सकाळी 10 ते दुपारी 4 च्या दरम्यान सूर्य खूप प्रखर असतो आणि त्यामुळे चक्कर येणे आणि उष्माघातसारखे प्रकार होऊ शकतात. या वेळेत बाहेर खेळणं देखील टाळा.

4. उन्हाळ्यात नेहमी कम्फर्टेबल कपडे घाला. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सुती कपडे आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. आपले डोके आणि कान सुती कापडाने झाकून ठेवा, त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते. कडक उन्हात छत्रीचा वापर करा, यामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे तुमच्या डोक्याला थेट उन्हाच्या झळा लागत नाही आणि तुम्ही आजारी पडण्यापासून वाचता.

5. उन्हाळ्यात मसालेदार आणि जास्त साखरेचे पदार्थ खाणं टाळा. अशा प्रकारच्या अन्नामुळे शरीराच्या तापमान नियंत्रण यंत्रणेच्या कार्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. उन्हात जाताना आधी पोटभर खाऊ घ्या, घर कधीही रिकाम्या पोटी सोडू नका.

6. धणे आणि पुदिना या दोन्हीमध्ये थंड गुणधर्म आहेत. उष्माघात टाळण्यासाठी, उन्हाळ्यात तुम्ही दररोज धणे आणि पुदिन्याचा रस पिऊ शकता.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/8Sk6A1H Facts: भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या...

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Heatstroke: जास्त पाणी पिऊन फायदा नाही; उष्माघात टाळायचा असेल तर कराव्या लागतील 'या' गोष्टी!https://ift.tt/CDQfwgy