Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ९ जून, २०२३, जून ०९, २०२३ WIB
Last Updated 2023-06-08T19:49:52Z
careerLifeStyleResults

Kitchen Tips: आलं फ्रीजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य? आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती?

Advertisement

How To Store Ginger In Fridge: आलं केवळ भाज्यांचीच चव वाढवत नाही, तर चहाचीही (Tea) चव वाढवते. चायनीज (Chinese) असो वा भारतीय पदार्थ (Indian Cuisine), आल्याचा वापर सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. हॉटेल-रेस्टॉरंटप्रमाणे आल्याचा वापर घरांमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु अनेकदा असं दिसून येतं की आलं (Ginger) काही वेळाने सुकतं आणि त्यात रस शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत ते फ्रीजमध्ये ठेवावं की नाही, याबाबत नेहमीच संभ्रम असतो. तर आज आलं साठवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

सामान्य तापमानात आलं ठेवता येईल

जर तुम्हाला एक किंवा दोन आठवड्यांपर्यंत आलं (Ginger) वापरायचं असेल, तर तुम्ही आलं सामान्य तापमानावर (Room Temperature) ठेवू शकता, परंतु थेट सूर्यप्रकाशापासून (Straight Sunlight) आलं दूर ठेवा आणि थंड, कोरड्या जागी ठेवा. आलं ओलसर ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये (Fridge) ठेवल्यास त्याला बुरशी (Fungus) येऊ शकते.

आलं फ्रिजमध्ये ठेवावं का?

जर तुम्हाला आल्याचं शेल्फ लाइफ वाढवायचं असेल आणि तुमच्याकडे भरपूर आलं असेल तर तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये (Refrigerator) देखील ठेवू शकता. परंतु, बऱ्याचदा रेफ्रिजरेटरमध्ये आलं (Ginger) ठेवल्यावर अनेक वेळा आलं सुकते किंवा आर्द्रतेमुळे (Moisture) कुजतं किंवा आल्याला बुरशी लागते, म्हणून ते नेहमी प्लास्टिकच्या पिशवीत (Plastic Bag) किंवा हवाबंद कंटेनरमध्ये (Air Tight Container) ठेवा.

अशा प्रकारे साठवा आलं

आलं दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी ते झिप लॉक बॅगमध्ये (Zip Lock Bag) किंवा सीलबंद पिशवीत (Seal Pack Bag) किचन पेपर टाकून तुम्ही आलं साठवू शकता, त्यामुळे आलं बराच काळ ताजं राहतं.

आल्याचा तुकडा सोलून किंवा किसून घेतल्यानंतर लगेच वापरा, अर्धं कापलेलं आलं लवकर खराब होतं.

जर तुमच्याकडे भरपूर आलं असेल तर आल्याचे लहान तुकडे करून त्याची पेस्ट बनवा. यासाठी पाण्याऐवजी थोडं तेल आणि मीठ वापरावं. मग त्यापासून बर्फाचे तुकडे करून फ्रिजरमध्ये ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचा वापर करा.

जर आलं सुकलं असेल तर तुम्ही ते सुकवून भाजून घेऊ शकता आणि पावडर बनवून देखील वापरू शकता.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/pR84Prt Reason: उचकी का लागते? खरंच पाणी प्यायल्यावर उचकी जाते की हा फक्त एक भ्रम? पाहा...

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Kitchen Tips: आलं फ्रीजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य? आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती?https://ift.tt/NR2JrIt