Advertisement
Reason Of Belly Fat : पोटाची चरबी (Belly Fat) वाढण्याची समस्या आजकाल अनेकांना जाणवते. ही अनावश्यक चरबी कमी करण्याकरीता लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फाॅलो करतात. अनेक जण तासनतास जिममध्ये व्यायाम करण्यात घालवतात. लठ्ठपणा वाढल्याने अनेक गंभीर आजार बळावतात. पोटाची चरबी केवळ दिसायलाच वाईट नाही तर तुमच्या शरिराकरताही चांगली नाही. वजनात थोडीही वाढ झाली किंवा लाईफस्टाईल बिघडली तर त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होतो आणि पोटाची चरबी वाढते. ही वाढलेली पोटाची चरबी कमी करण्याकरता लोक खूप मेहनत घेतात. मात्र याचे कारण जाणून घेतल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यास अधिक मदत होऊ शकते. व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार, ताणतणाव अशी अनेक कारणे याला कारणीभूत आहेत. पोटाची चरबी वाढण्याचे नेमके कारण काय आहेत जाणून घेऊ.
या कारणांमुळे वाढते पोटाची चरबी
1. अयोग्य आहार, अनियमीत व्यायाम या कारणांमुळे शरीरातील अनावश्यक चरबी वाढते. संपूर्ण दिवस एकाच ठिकाणी बसून राहिल्याने पोटाची चरबी वाढते.
2. तुमच्या रोजच्या कामाचा तुमच्या पोटावरील चरबीवर परिणाम होऊ शकतो. नऊ ते पाच पर्यंत बसणे म्हणजे तुमची शारीरिक हालचाल काहीच होत नाही. म्हणून, आॅफिसमध्ये काम करताना वॉशरूम ब्रेक घ्या, भरपूर पाणी प्या आणि दर तासाला ऑफिसमध्ये फिरा. दररोज व्यायाम करण्यासाठी वेळ काढा.
4. ताणतणाव आणि हार्मोनल असंतुलनामुळे वजन वाढू शकते. तणावाच्या काळात आपल्या अॅड्रेनल ग्रंथी अॅड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स सोडतात. यामुळे शरीरात चरबी जमा होते.
5. झोपेच्या कमरतेमुळे देखील चरबीचे प्रमाण वाढते.
6. बर्‍याच मुलींना त्यांच्या मासिक पाळीत जंक फूड किंवा गोड खाण्याचे क्रेविंग होते. ज्यामुळे त्या या काळात भरपूर फॅट वाढवणारे पदार्थ खातात. त्यामुळे पोटाची चरबी वाढते.
7. साखर (Sugar) खाल्ल्याने पोटाची चरबी सर्वात जास्त वाढते. मिठाई, गोड पदार्थ किंवा साखरेचा चहा प्यायल्याने तुमच्या पोटाची चरबी वाढतच जाते.
8. दिवसातून 2 कप पेक्षा जास्त चहा प्यायल्याने पोटाची चरबी वाढू शकते. अनेकजण गुळाच्या चहाच्या नावाखाली दिवसभरात 6 ते 7 कप चहा पितात. पण गुळाचा चहा असला तरी इतका चहा पिणे योग्य नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/EIJQyqT Tea : ग्रीन टीचे फायदे अनेक, पण... 'या' चुका पडतील महागात; होईल भलतंच
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Reason Of Belly Fat : पोटाची चरबी वाढतेय? असू शकतात 'ही' कारणं, वाचा सविस्तरhttps://ift.tt/cDeAn1j
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Reason Of Belly Fat : पोटाची चरबी वाढतेय? असू शकतात 'ही' कारणं, वाचा सविस्तरhttps://ift.tt/cDeAn1j