Advertisement

<a href="https://ift.tt/rNyURzK These Drink in Summer : उन्हाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात उष्माघातासाह इतर आजार होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात आपण अनेकदा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी काय ठेवण्यासाठी अधिक पेय पिण्याचा सल्ला दिला जातो. पण, आपण उन्हाळ्यात काही गोष्टींचं सेवन केल्यानं तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. हे पेय कोणते आणि त्याचा आरोग्यावर काय वाईट परिणाम होईल, जाणून घ्या.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा आरोग्यावर वाईट परिणाम

अनेकदा उन्हाळ्यात योग्य माहिती नसल्यामुळे आपण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचे पालन करतो. यामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतो. या सवयींचा दुष्परिणाम काही वेळा लगेच जाणवत नाही, पण आपल्या शरीराची सहन करण्याची क्षमता संपल्यावर याचा परिणमा दिसू लागतो. त्यामुळे आपण आजारी पडतो. उन्हाळ्याच बहुतेकांना डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. या परिस्थितीत तुम्हाला काही खाद्यपदार्थ विशेषत: पेयांचं सेवन करणं टाळणं गरजेच आहे.

उन्हाळ्यात 'या' पेयाचं सेवन करू नये

उन्हाळ्यात पाणी आणि द्रवपदार्थ पिण्यास सांगितलं जातं पण काही पेय पिण्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यात 'या' पेयाचं सेवन करू नये किंवा केल्यास मर्यादित प्रमाणात सेवन केलं पाहिजे. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

उन्हाळ्यात खालील पदार्थांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो

कॉफी

जर तुम्ही उन्हाळ्यात खूप जास्त कॉफी प्यायली तर ती तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. कॉफीमध्यं असलेल्या कॅफीनमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होऊन आजारी पडू शकता. उन्हाळ्यात शक्यतो कॉफीचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला कॉफी प्यायल्याशिवाय जमत नसेल तर एक किंवा दोन कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका. अतिरेक टाळा.

चहा

उन्हाळ्यात चहा पिणंही टाळावा. चहा देखील उन्हाळ्यात तुमच्या शरीरासाठी वाईट ठरतो. चहामध्येही कॅफिन असते, यामुळे तुमचं शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. याशिवाय चहा प्यायल्याने तुम्हाला लघवी जास्त होते आणि उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने तुमच्या शरीराचं निर्जलीकरण होऊ शकतं. चहा युरेटिक प्रमाणे काम करतो. यामुळे तुम्हाला वारंवार लघवी होण्याची समस्या होते आणि तुमच्या शरीरातून पाणी निघून जाऊन तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते.

सोडा

उन्हाळ्यात अनेक लोक तहान भागवण्यासाठी आणि उन्हाची झळ कमी करण्यासाठी सोडा पिणं पसंत करतात. पण यामुळे तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. सोड्यामध्ये कार्बन आणि भरपूर प्रमाणात फॉस्फोरिक ऍसिड असते. यामुळे हृदय आणि मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात. जर तुम्ही रोज सोडा प्यायला तर तुम्हाला ऑस्टियोपोरोसिस सारखी समस्या होऊ शकते. दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो उन्हाळ्याच सोडा पिणं टाळावं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

औषधानंतर द्राक्ष खाणं जीवघेणं, होऊ शकतो मृत्यू? या दाव्यामागचं नेमकं सत्य काय?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Summer Tips : उन्हाळ्याच्या दिवसात 'हे' पेय पिण्याची चूक करु नका, आरोग्यावर होईल वाईट परिणामhttps://ift.tt/7bPMIfc
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Summer Tips : उन्हाळ्याच्या दिवसात 'हे' पेय पिण्याची चूक करु नका, आरोग्यावर होईल वाईट परिणामhttps://ift.tt/7bPMIfc