Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ८ जून, २०२३, जून ०८, २०२३ WIB
Last Updated 2023-06-08T12:49:15Z
careerLifeStyleResults

Travel :भटकंती करणं का चांगलं? हे सात चित्रपटत सांगतात आयुष्यातील प्रवासाचे महत्त्व

Advertisement

Travel Tips : "सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कही या" गाण्याप्रमाणे प्रवास करणे आयुष्यात किती महत्वाचे आहे याची प्रचिती येते. बाॅलिवुडमध्ये अनेक फिल्म्स आहेत ज्या तुम्हाला प्रवास करण्यासाठी, भटकंती करण्यासाठी (Travel) प्रेरणा देत असतात. कोणत्या ठिकाणी फिरायला जायला हवे , ठिकाण कसे निवडले पाहिजेत. या सगळ्याची माहिती तुम्हाला या काही चित्रपटातून मिळू शकते.

​जब हैरी मेट सेजल (2017)

इम्तियाज अलीच्या या फिल्ममध्ये ट्रॅव्हल कसे करायला हवे हे सांगितले आहे. फिल्ममध्ये दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश  आणि काश्मीर या ठिकाणांसोबतच अनेक परदेशातील लोकेशनही दाखवण्यात आली आहेत. या चित्रपटात शाहरुख खान 'हैरी'ची भूमिका केली आहे तसेच तो एक ट्रॅव्हल गाइड (Travel Guide) चे काम करताना दाखवले आहे.

करीब करीब सिंगल (2017)

इरफान खान आणि अॅक्ट्रेस पार्वती यांची केमिस्ट्री या फिल्ममध्ये दाखवण्यात आली आहे. ऋषिकेशपासून बिकानेर आणि मग गंगटोक असा प्रवास दाखवला आहे. त्यांचा हा प्रवास बस, टॅक्सी, रोपवे आणि कारने करताना दाखवले आहे. फिल्मचे चित्रीकरण उत्तराखंड, दिल्ली आणि राजस्थान असा अनेक ठिकाणी करण्यात आले आहे.

तमाशा (2015)

इम्तियाज अलीचा आणखी एक चित्रपट 'तमाशा' देखील प्रवासावर आधारित बॉलिवूड चित्रपटांच्या यादीत आहे. या चित्रपटातील मुख्य पात्रांची ओळख कोर्सिकाशी होते.  विविध ठिकाणांचे सौंदर्य अप्रतिम पद्धतीने यात दाखवण्यात आले आहे.

हायवे (2014)

हिमाचल प्रदेशची अद्भूत सुंदरता या चित्रपटात दाखवली आहे. एकीकडे पर्वतांची सुंदरता तर दुसरीकडे दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि पंजाबच्या मैदानी भाग दाखवला आहे.

ये जवानी है दिवानी (2013)

2013 मध्ये आलेल्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाचा पहिला भाग गुलमर्गच्या सौंदर्यात पाहायला मिळत आहे. यानंतर रणबीर कपूर जगभरातील अनेक देशांमध्ये जातो. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही लगेच बॅग बांधून फिरायला जाल. चित्रपटाचा दुसऱ्या  भागात राजस्थानातील राजवाडे दाखवले गेले आहेत.

क्वीन (2013)

या  चित्रपटात कंगना रानावत एकटीच हनीमूनकरीता निघून जाते. पॅरिस आणि अॅमस्टरडॅम याठीकाणी जाऊन ती एकटीने एन्जाॅय करते.

जिंदगी ना मिलेगी दोबारा (2011)

या चित्रपटात तीन मित्र मिळून स्पेनला रोड ट्रिप करतात. यात स्काय डायविंग आणि 'ला टोमेटिना'या फेमस फेस्टिवलबद्दल दाखवले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/8H7mTMQ Places : उन्हाळ्यात 'या' ठिकाणांना भेट द्या जेथे खर्च कमी होईल आणि तुम्हाला भरपूर आराम मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Travel :भटकंती करणं का चांगलं? हे सात चित्रपटत सांगतात आयुष्यातील प्रवासाचे महत्त्वhttps://ift.tt/ih9mrXD