Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ५ जून, २०२३, जून ०५, २०२३ WIB
Last Updated 2023-06-05T15:48:49Z
careerLifeStyleResults

World Environment Day : जागतिक पर्यावरण दिन, 'या' 5 मार्गांनी तुम्ही शाश्वत पर्यावरण जीवनशैलीचा करू शकता अवलंब!

Advertisement

World Environment Day : आज सगळीकडे जागतिक पर्यावरण दिन ( World Environment Day ) साजरा केला जात आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्यावरणीय जीवन पद्धतींचा अवलंब केला, तर पृथ्वीचं संरक्षण केलं जाऊ शकतं. यासाठी आपल्या सगळ्यांनी काही शाश्वत पर्यांयाची निवड करण्याची आवश्यकता आहे. यामुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचा आणि जैवविविधतेच नव्हे; तर आपल्या येणाऱ्या पिढीच्या चांगल्या भवितव्यासाठीही महत्त्वाचं आहे. यासाठी अक्षय ऊर्जा, कचरा कमी करणे,जैवविविधतेला प्रोत्साहन देणे आणि निरोगी जीवनशैलीसाठी आपल्या सगळयांच्या सामूहिक प्रयत्नांची  खूप गरज आहे.जागतिक पर्यावरण दिन हा एक चांगले निमित्त आहे. यामुळे आपल्याला शाश्वत पर्यावरण जीवनशैली स्वीकारण्यासाठी, हिरव्यागार वसुंधरेसाठी  आणि स्वच्छ जगासाठी प्रेरणा मिळते. यासाठी तुम्ही  या 5 पर्यावरणीय शाश्वत जीवलशैलीचा मार्गाचा अलवलंब करू शकता.

वापरात नसलेल्या वस्तूंचा पुर्नवापर करा :

सध्या जगभर रिसायकलिंगला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं जात आहे. यामुळे पर्यावरणीय शाश्वत भविष्यासाठी टाकाऊ पासून टिकाऊ पद्धतीचा अवलंब करायला हवा. यामध्ये जुन्या वापरात नसलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करणे, टाकाऊ वस्तूचे सुंदर आणि कलात्मक वस्तूंमध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्ही तुमच्या घरातील एका अडगळीत पडलेलं फर्निचर,कपडे, जुनी खेळणी आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू इत्यादी. याची योग्य विल्हेवाट लावल्यामुळे घरातील कचरा तर कमी होतो. यामुळे माणसातील क्रिएटिव्हीटीलादेखील प्रोत्साहन मिळते, कचऱ्याच्या स्वरूपात पडून असणाऱ्या वस्तूंचे एका चांगल्या वस्तूचं रूप मिळतं आणि आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना  पृथ्वीसाठी आणखीन कार्यक्षम पद्धतीनं काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. यामुळे टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा निर्माण करणे हे शाश्वत जीवनशैलीतील एक महत्वाचं पाऊल ठरू शकते.

डिशवॉशरचा वापर करा आणि पाणी वाचवा :

भारतीय घरामध्ये किचनला अनन्यसाधारण महत्व आहे. किचनशी एक भावनिक नातं असल्यामुळे भांडी स्वच्छ ठेवली जातात. पण डिशवॉशर मशिनचा वापर केला, तर भांडी स्वच्छ निघतात. डिशवॉशर हे पाणी आणि ऊर्जा वापरात सर्वात कार्यक्षम पर्याय ठरू शकतो. भारतामध्ये खूप कमी लोक डिशवॉशरचा वापर करतात. पण ज्या कुटुंबात अजूनही डिशवॉशरचा वापर जात नाही त्यांनी वापर सुरू करायला हवा. चहा, स्वंयपाक करून काळेकुट्ट होणारी भांडी, तेलकट भांडी यांना स्वच्छ करण्यासाठी जास्त घासावं लागतं. यासाठी पाणीही खूप लागतं. पण डिशवॉशरचा वापर केल्यामुळे पाणी कमी लागते आणि  भांडी स्वच्छ निघतात. भारतात वेगवेगळ्या कंपन्यांचे डिशवॉशर मशिन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पाणी हे नैसर्गिक संसाधन असून  त्याची बचन करायला हवी.

सौरऊर्जेचा वापर :

शाश्वत पर्यावरण जीवनशैलीच्या पद्धतीमध्ये आपल्यात काळानुसार बदल करायला हवा. पारंपारिक ऊर्जेच्या वापर कमी कमी करायला हवा. तसेच सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यायला हवा. यासाठी स्मार्ट होम सिस्टीमचा वापर करायला हवा. संपूर्ण घराला सौरऊर्जेवर चालणाऱ्या वीजचं कनेक्शन जोडायला हवं. घरातील लाईट, गिझर आणि एअर  कंडिशन, कुलर आणि स्वंयपाक बनण्यासाठी सोलर पॅनलची सिस्टीम बसवून घेता येऊ शकते. तसेच शेतीला पाणी देण्यासाठी सौरऊर्जा हा चांगला पर्याय ठरू शकतो.  यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहनही दिल जातं. याचा शेतकरी आणि नागरीकांनी स्मार्टपणे वापर करायला हवा. यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होईल आणि पर्यावरणाचेही संरक्षण होईल. आपल्याकडे पारंपारिक ऊर्जा स्त्रोत कमी आहेत. त्याची गरज असेल तरच वापर करायला हवा.

आपले घर आणि बगिचा :

शाश्वत पर्यावरणासाठी आपल्या घरापासून आपण एक छोटीशी सुरूवात करू शकतो. आपण गावी राहत असू तर अंगणात आणि शहरात राहत असू तर टेरिसवर हिरव्यागार बागेची उभारणी करू शकतो. यामुळे शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. यासाठी जैवविविधतेचं संरक्षण होईल,पर्यावरणाला फायदेशीर ठरतील अशा वनस्पतींच्या रोपांची लागवड करायला हवी. या रोपांसाठी सेंद्रिय खतांचा वापर करा. यामुळे मातीचे पोषण तर होईलच आणि पर्यावरणालाही लाभ होईल. विविध रंगी फुलांची झाडे आणि घराच्या सभोवती हिरव्यागार झाडांमुळे घराच्या सौंदर्यात भर पडते. यासोबत निसर्ग सान्निध्यात राहिल्यामुळे मन प्रसन्न राहते. तसेच पर्यावरणालाही छोटासा पण महत्त्वाचा हातभार लागू शकतो.

ऊर्जेची बचत आणि जागरूकता :

आपल्याकडे आजही पारंपारिक ऊर्जेचा जास्त वापर केला जातो. यामुळे ऊर्जेचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी लईडी दिव्यांचा वापर करावा. यामुळे कमी ऊर्जा लागते. गरज नसताना  घरातील पंखे आणि लाईटचे बटण बंद करा. हेच नियम आपण शाळा, महाविद्यालयात वर्गखोल्यातून बाहेर पडताना लागू करावेत. या छोट्या छोटया कृतीमुळेही ऊर्जेची बचत होऊ शकते. यासाठी पारंपारिक मार्गाच बंद करून आधुनिक पर्यारणीय मार्गाचा अवलंब करण्यावर भर दयायला हवा. अशा प्रकारे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या प्रत्येकाचं छोटसं पाऊल शाश्वक पर्यावरण जगाकडे टाकलेले मोठे पाऊल ठरू शकते. तुमची प्रत्येक छोटी कृती तुम्हाला पर्यावरणावर प्रेमी बनवू शकते.

इतर बातम्या वाचा :

<a href="https://ift.tt/X1CrMwm Environment Day: शेती रसायनमुक्त होणार, नमामि गंगेला मिळणार नवी ताकद: पंतप्रधान मोदी

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: World Environment Day : जागतिक पर्यावरण दिन, 'या' 5 मार्गांनी तुम्ही शाश्वत पर्यावरण जीवनशैलीचा करू शकता अवलंब!https://ift.tt/LetuAFU