Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, २ जुलै, २०२३, जुलै ०२, २०२३ WIB
Last Updated 2023-07-02T08:49:03Z
careerLifeStyleResults

Beauty Tips : परटसठ तयर हतय आण चहऱयवर हव इनसटट गल? टमटच 'ह' 3 फस पक ठरतल फयदशर

Advertisement

Tomato Face Pack For Instant Glow : टोमॅटो खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की टोमॅटो (<a href="https://ift.tt/vWlcfxS) त्वचेवर चमक आणण्यासाठीही तितकाच प्रभावी आहे. एखाद्या ब्युटी प्रॉडक्टपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने हे त्वचेवर काम करते. टोमॅटोमध्ये सर्व पोषकतत्वे उपलब्ध असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक (Skin Glow) येते, चेहरा तरुण दिसतो आणि स्किन टोन देखील उजळतो. यात लायकोपिन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असे बरेच घटक असतात. तुम्ही घरबसल्या टोमॅटोचा फेस पॅक लावून त्वचेवर चमक मिळवू शकता, यामुळे तुमचा पार्लरचा खर्च देखील वाचेल. तर जाणून घेऊया टोमॅटोपासून फेस पॅक कसा बनवला जातो.

टोमॅटो आणि दही फेस मास्क

साहित्य

दोन चमचे टोमॅटो पल्प

एक चमचा दही

एक चमचा लिंबाचा रस

मास्क बनवण्याची कृती

टोमॅटो आणि दह्याचा फेस मास्क बनवण्यासाठी पहिल्यांदा सर्व साहित्य एकत्र मिसळून चांगली पेस्ट तयार करुन घ्यावी. आता हा मास्क चेहऱ्यावर 15 ते 20  मिनिटं लावावा. जेव्हा हा मास्क संपूर्णपणे सुकेल, त्यावेळी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. हा मास्क चेहऱ्यावर चमक आणण्याशिवाय चेहऱ्यावरील डाग देखील दूर करतो. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध टोमॅटोमध्ये पेक्टिन आणि फ्लेवोनॉयड सारखे चेहऱ्यावर ग्लो आणणारे घटक असतात, त्यामुळे चेहरा तरुण राहतो आणि चेहऱ्यावरील वृद्धत्व कमी होतं.

टोमॅटो आणि काकडीचा फेस मास्क

साहित्य

दोन चमचे टोमॅटो पल्प

एक चमचा काकडीचा रस

एक चमचा मध

मास्क बनवण्याची कृती

टोमॅटो आणि काकडीचा फेस मास्क बनवण्यासाठी सर्व साहित्य मिसळून घट्ट पेस्ट तयार करुन घ्यावी. आता ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यावी. आता हा मास्क चेहऱ्यावर 10 मिनिटं लावून ठेवावा, त्यानंतर चेहरा पाण्याने धुवावा. हा मास्क चेहरा तजेलदार बनवतो आणि चेहऱ्याला थंड ठेवतो. या फेस मास्कमुळे चेहऱ्यावर चांगला ग्लो येतो. टोमॅटोमध्ये बीटा कॅरोटीन लायकोपिन, ल्युटीन व्हिटॅमिन सी आणि ई सारखे अनेक दाहक-विरोधी (anti-inflammatory) घटक आहेत जे त्वचेला आतून निरोगी ठेवण्यास मदत करतात.

टोमॅटो आणि हळदीचा फेस मास्क

दोन चमचे टोमॅटो पल्प

एक चमचा बेसन

दोन चमचे दही

अर्धा चमचा लिंबाचा रस

चिमूटभर हळद

मास्क बनवण्याची कृती

टोमॅटो आणि हळदीचा फेस मास्क बनवण्यासाठी सर्व साहित्य मिसळून घट्ट पेस्ट तयार करुन घ्यावी. आता ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यावी. आता हा मास्क चेहऱ्यावर 20 मिनिटं लावून ठेवावा, त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. हा पॅक लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील घाण निघून जाईल आणि त्वचा उजळ बनेल.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/eLQSRzP महागडी केमिकल उत्पादनं वापरणं सोडा; आंब्याची पानं वापरली तर थांबेल केस गळती

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Beauty Tips : पार्टीसाठी तयार होताय आणि चेहऱ्यावर हवा इन्स्टंट ग्लो? टोमॅटोचे 'हे' 3 फेस पॅक ठरतील फायदेशीरhttps://ift.tt/wqItBTP