Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १५ जुलै, २०२३, जुलै १५, २०२३ WIB
Last Updated 2023-07-15T07:48:37Z
careerLifeStyleResults

तुम्हीही घाईघाईत जेवून आजारांना आमंत्रण देताय का? नुकसान जाणून घ्या

Advertisement

Food Eating Habit : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वत:कडे लक्ष देणं विसरत चाललो आहोत. आपल्या आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या कोणत्या वाईट याचा सुद्धा आपण विचार करत नाही. त्यामुळे बाहेरचं जंक फूड खाणं, आरोग्याकडे दुर्लक्ष करणं यांसारखे प्रकार अगदी सहज घडतात. आपल्याजवळ इतका वेळ नसतो की जेवतानाही आपण घाईघाईने जेवतो. आयुर्वेदात हळूहळू आणि चघळल्यानंतर खाण्याचा सल्ला दिला आहे. विज्ञान देखील या गोष्टीवर विश्वास ठेवते. विज्ञानानुसार अन्न लवकर खाल्ल्याने अन्नासोबत हवाही शरीरात पोहोचते. त्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या सुरू होते. जर तुम्हीही जलद खात असाल तर तुम्हाला फास्ट खाण्याचे दुष्परिणाम देखील जाणून घ्या.

लवकर वजन वाढणे

विज्ञानानुसार, जेव्हा आपण अन्न जेवतो तेव्हा मेंदू 20 मिनिटांनंतर पोट भरल्याचा सिग्नल पाठवतो. जेव्हा अन्न पटकन खाल्ले जाते, तेव्हा मेंदू हा सिग्नल उशिराने देतो. ज्यामुळे जास्त अन्न खाल्ले जाते. त्यामुळे वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.

मधुमेहाचा धोका

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, लवकर अन्न खाणाऱ्यांना हळू खाणाऱ्यांच्या तुलनेत अडीच पट जास्त मधुमेह होण्याची शक्यता असते. यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी खालावते, ज्यामुळे टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.

इन्सुलिन प्रतिकार

फास्ट खाणाऱ्यांच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनची पातळी बिघडते. त्यामुळे चयापचय समस्या वाढू लागतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही असतो.

पचन समस्या

अन्न खूप वेळा खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण लवकर खातो तेव्हा आपण अन्नाचे मोठे तुकडे उचलतो. ते पचवण्यासाठी पचनसंस्थेला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अपचनाची तक्रार होऊ शकते आणि अन्नही उशिराने पचते.

मन तृप्त होत नाही

जेव्हा तुम्ही पटकन अन्न जेवता तेव्हा तुमचे पोट अन्नाने भरले तरी तुमचे मन तृप्त होत नाही. यामुळे, आपण अन्नाने तृप्त होऊ शकत नाही. यामुळेच काही लोक अनेकवेळा पोट भरूनही अन्न खातात. त्याचा परिणाम वजनावर दिसू लागतो आणि लठ्ठपणा वाढू लागतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/2eA4Zwm Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: तुम्हीही घाईघाईत जेवून आजारांना आमंत्रण देताय का? नुकसान जाणून घ्याhttps://ift.tt/wDRjfZQ