Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, १६ जुलै, २०२३, जुलै १६, २०२३ WIB
Last Updated 2023-07-16T12:49:07Z
careerLifeStyleResults

Fatty Liver: फॅटी लिव्हर डिसीज असेल तर आहार कसा असावा, घ्या जाणून

Advertisement

Health Care : फॅटी लिव्हर <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/j2OtzJL Liver) डिसीज हा आजच्या आधुनिक जीवनात एक सामान्य आजार होत आहे, ज्यामध्ये यकृतामध्ये जास्त चरबी जमा होते. याचे दोन मुख्य प्रकार आहेत - पहिला म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग हा अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे होतो.

फॅटी लिव्हर डिसीजची काही सामान्य कारणे म्हणजे जास्त लठ्ठपणा , मधुमेह (Diebeties), उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसरायड्स, अयोग्य आहार, थायरॉईड समस्या, खाण्याचे अनियमित वेळापत्रक आणि हिपॅटायटीस बी आणि सी सारखे संक्रमण इ. आज आम्ही तुम्हाला 5 आहार आणि जीवनशैली टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही फॅटी लिव्हर रोग दूर करू शकता.

- फॅटी लिव्हर डिसीज असेल योग्य आणि सकस आहार घेणे गरजेचे आहे. त्याकरता रोजच्या आहारात प्रथिने, जीवनसत्वे, पालेभाज्या यांचा समावेश करायला हवा.

- तसेच तुम्ही लठ्ठ असाल तर लगेच तुमचे वाढलेले वजन कमी करा. तुमच्या शरीराचे वजन सुमारे 10% जरी कमी केले तरी तुमच्या यकृताला याचा फायदा होऊ शकतो.

- अल्कोहोलचे सेवन कमी करा कारण यामुळे तुमचे यकृत खराब होऊ शकते आणि फॅटी लिव्हर रोग आणखीन गंभीर होऊ शकतो. जर तुम्हाला फॅटी लिव्हर रोग असेल तर अल्कोहोल पूर्णपणे सोडा.

- रोज सकाळी चालायला जावा तसेच नियमित योगा करणे गरजेचे आहे.याने तुमचे लिव्हर हेल्दी राहू शकते.

- रक्तातील साखरेची उच्च पातळी फॅटी यकृत रोगास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकते. गोड पदार्थ आणि पेये कमी प्रमाणात सेवन करा.

- ओट्स तुम्हाला केवळ वजन कमी करण्यातच नाही तर फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यातही मदत करू शकतात.ओट्समध्ये असलेले फायबर, लो फॅट, कॉम्प्लेक्स कार्ब तुमच्या यकृताला आराम देण्याचे काम करतात.

- तसेच आरोग्यदायी फळांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेलं अॅव्होकॅडो तुमच्या यकृतासाठी चांगली असते, जे तुम्हाला पचायला सोपी असते. एवढेच नाही तर एवोकॅडोमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडही मोठ्या प्रमाणात आढळते, जे तुमचे फॅटी लिव्हर कमी करण्यास आणि यकृताचे नुकसान भरून काढण्यास मदत करते.

- जर तुम्ही वजन कमी करण्याचा किंवा शरीरातील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही लसूण पावडर खाऊ शकता, ज्यामुळे तुमच्या यकृतावरील चरबी कमी होण्यासही मदत होईल.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/onS9wVC of Spices : हळद, आलं, काळी मिरीसह 'हे' मसाले औषधी; कोणत्या आजारांवर गुणकारी? जाणून घ्या...

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Fatty Liver: फॅटी लिव्हर डिसीज असेल तर आहार कसा असावा, घ्या जाणूनhttps://ift.tt/ldo65zB