Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ८ जुलै, २०२३, जुलै ०८, २०२३ WIB
Last Updated 2023-07-08T07:48:21Z
careerLifeStyleResults

Fungal Infection : सवधन! पवसळयत फगल इफकशनच धक अधक मग कळज कश घयल?

Advertisement

<a href="https://ift.tt/UbpXYkF of Fungal Infection In Monsoon : पावसाळा सुरु झाल्यामुळे अखेर उन्हाच्या तडाख्यापासून मिळाला आहे. पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण, पावसाळ्यात अनेक आजार आणि संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. पावसाळ्यामध्ये सर्दी, ताप यांसारख्या आजारांसोबत अनेक संसर्गजन्य आजारही वेगाने पसरतात. पावसाळ्यात आपण भिजल्यामुळे किंवा सतत पाण्यात राहिल्यामुळे फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) म्हणजे बुरशीजन्य आजार होण्याचा धोकाही जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची योग्यप्रकारे काळजी घेण्याची गरज असते. नाहीतर, या सारख्या आजारांना बळी पडण्याची वेळ येते. असं होऊ नये म्हणून काय करायचं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पावसाळ्यात दमट वातावरण आणि ओलसरपणामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. बुरशीजन्य आजार म्हणजे, फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि कशी ते जाणून घ्या.

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं?

आरामदायक कपडे वापरा

सुती किंवा इतर आरामदायक कापडाचं कपडे वापरा. यामुळे त्वचेला श्वास घेण्यास जागा मिळेल. सैल कपडे घातल्यामुळे  हवा शरीरात जाईल आणि शरीर ओलसर राहणार नाही. यामुळे तुमची त्वचा कोरडी राहिल आणि बुरशीपासून संरक्षण होईल.

वैयक्तिक स्वच्छता राखा

फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तुमचे हात आणि पाय नियमितपणे अँटी फंगल साबणाने धुवा. विशेषतः पावसात भिजल्यानंतर पायांमध्ये चिखल किंवा घाणेरडं पाणी यामुळे तुम्ही अनेक रोगजन्य विषाणूचा संपर्कात येता, यामुळे बाहेरून आल्यावर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवा. तुमची नखे लहान आणि स्वच्छ ठेवा, यामुळे पावसाळ्यात तुम्हाला संसर्ग टाळता येईल.

त्वचा कोरडी ठेवा

ओले कपडे अधिक काळ अंगावर ठेवू नका. जास्त वेळ त्वचा ओली राहिल्यास फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. पावसात भिजल्यानंतर स्वतःला पूर्णपणे कोरडं करा, शक्य असल्यास कपडे बदला किंवा इतर पद्धतीने कपडे सुकवण्याचा प्रयत्न करा. ओलावा राहिल्यास बुरशीचा धोका जास्त असतो. त्यामुळे शरीर मुख्यत: हात, पाय आणि काखेत ओलसरपणा राहणार नाही याची काळजी घ्या.

हायड्रेटेड रहा

पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. योग्य आहार घ्या. जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहारामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते, यामुळे तुमचं शरीर फंगल इन्फेक्शन प्रतिरोधक होईल.

अँटीफंगल पावडर

त्वचा कोरडी ठेवण्यासाठी आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी तुम्ही अँटीफंगल पावडर वापरू शकता. विशेषतः ज्या भागात जास्त घाम येतो, तेथे अँटीफंगल वापरणे फायदेशीर ठरेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

संबंधित इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/ZWpz6lV Infection : पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा धोका, अशी मिळवा सुटका

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Fungal Infection : सावधान! पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा धोका अधिक, मग काळजी कशी घ्याल?https://ift.tt/oHmg9US