Advertisement
Crocodile Tear Syndrome : जगात अनेक विचित्र आजार <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/wHs4Rdl> आहेत. यापैकी काहींबद्दल तुम्हाला माहिती आहे आणि काहींबद्दल जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल असे अजून अनेक रोग आहेत. ज्यांचे उपचार अद्याप सापडलेले नाहीत. तेथे काही रोग जे असे आहेत जे लोकांना तसेच कित्येकदा डाॅक्टरांना देखील आश्चर्यचकित करतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका आजाराविषयी सांगणार आहोत, ज्‍याच्‍याविषयी बहुतेक लोकांनी ऐकले नसेल किंवा कोणत्‍याही प्रकारची माहिती नसेल. या विचित्र आजाराचे लोक अन्न खाऊन आणि पाणी पिऊनही घाबरू लागतात. हा असा आजार आहे, ज्यामध्ये रुग्ण घाबरून खाणे-पिणे बंद करतो. या आजाराचे नाव आहे "Crocodile Tear Syndrome."
बऱ्याचदा एखादी व्यक्ती जेव्हा दुःखी किंवा आनंदी असते तेव्हा रडते. हे अगदी नैसर्गिक आहे. पण जरा त्या व्यक्तीचा विचार करा जिच्या शरीराला फक्त अन्न खाऊन किंवा पाणी पिऊन अश्रू येतात. हा आश्चर्यकारक आजार जगात फार कमी लोकांना झालेला आहे. हे लोक जेंव्हा काही खातात किंवा पितात तेंव्हा ते रडायला लागतात.
हा रोग गुस्टो लॅक्रिमेशन म्हणून ओळखला जातो
जेवताना माणसाच्या डोळ्यातून अश्रू येणे हे 'क्रोकोडाइल टियर्स सिंड्रोम' या आजारामुळे होते. या सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या रडण्याचा अन्नाची चव किंवा तहान याच्याशी काहीही संबंध नाही किंवा ते मसालेदार अन्न खाल्यामुळेही होत नाही. खरंतर यामागचं कारण आहे 'लॅक्रिमल ग्रंथी'. जेव्हा या ग्रंथीवर वाईट परिणाम होतो तेव्हा हा सिंड्रोम आपोआप उद्भवतो आणि पीडित व्यक्तीचे अन्न खाताना स्वतःवर नियंत्रण राहत नाही. या सिंड्रोमला गुस्टो-लॅक्रिमेशन असेही म्हणतात.
हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे
आतापर्यंत जगात फक्त 95 लोक या आजाराच्या विळख्यात आले आहेत. अलीकडेच या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी त्यांचे अनुभव शेअर केले आणि सांगितले की, सिंड्रोममुळे त्यांना खाणे पिणे कठीण झाले आहे. यामुळे, ते त्याच्या मित्रांसोबत दुपारचे किंवा रात्रीचे जेवण करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही. सुरुवातीला त्याला यामागचे कारण समजले नाही, पण नंतर त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा कळले की तो क्रोकोडाइल सिंड्रोमचा बळी आहे. जेवण करताना खाण्यावर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण राहत नाही आणि अचानकच डोळ्यातून पाणी यायला लागते. ज्यावर आमचा कंट्रोल मुळीच राहच नाही , असेही काही रुग्णांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
<a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/M5UqXQE Video : खिचडी शिजवण्यावरुन दोघी भिडल्या, शाळेतच एकमेकींच्या झिंज्या ओढल्या; व्हिडीओ व्हायरल
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: GK : असा कसा हा आजार? अन्न खाल्ल्यानंतर माणूस चक्क रडू लागतो!https://ift.tt/TfX1n8Z