Advertisement

Health Tips : पावसाळा सुरु झाल्यावर अनेक संसर्गाचा धोका असतोच त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हीही पावसात वारंवार आजारी पडता का? तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची भीती वाटते का? थोड्या थंडीमुळे तुमची प्रकृती गंभीर झाली असं वाटत असेल तर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे असं समजा. खरंतर, कोणत्याही संसर्ग किंवा रोगाशी लढण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल, तर तुम्ही एकदा तुमच्या खाण्याकडेही लक्ष द्या. कारण असे काही खाद्यपदार्थ आहेत जे तुमची प्रतिकारशक्ती कमी करतात आणि तुम्हाला त्याची जाणीव नसते. चला जाणून घेऊयात हे पदार्थ नेमके कोणते आहेत.

कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण

वारंवार आजारी पडणे

सतत थकवा जाणवणे

पचन समस्या

पोटात जळजळ होणे

'हे' पदार्थ तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतात

साखर : जास्त साखर खाल्ल्याने रोगप्रतिकारक पेशींची क्रिया कमी होते. अशा वेळी नैसर्गिक गोड पदार्थांचं सेवन करा. जसे की, फळं. मिठाईचे सेवन मर्यादित करा.

प्रक्रिया केलेले अन्न : प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये अनेकदा अस्वास्थ्यकर चरबी, सोडियमची उच्च पातळी आणि कृत्रिम पदार्थ असतात. हे घटक शरीरातील जळजळ वाढवू शकतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात. त्याऐवजी प्रक्रिया न केलेले अन्न जसे की फळे, भाज्या, आणि प्रथिनांचा आहारात समावेश करा.

अल्कोहोल : अल्कोहोलचे अतिसेवन देखील रोगप्रतिकारक पेशी कमकुवत करू शकते. यामुळे पौष्टिकतेची कमतरता होऊ शकते. झोपेची पद्धत विस्कळीत होऊ शकते. शरीराला सूज येऊ शकते. अशा परिस्थितीत अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा.

तळलेले पदार्थ : पावसाळ्यात तसेही तळलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात अनेकदा अनहायजेनिक ट्रान्स फॅट्स आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ पोटात जळज तयार करतात. आणि अॅसिडीटी सारखी समस्या उद्भवते. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते. पदार्थ तळण्याऐवजी बेकिंग, ग्रिलिंग किंवा वाफवणे या पद्धतीने अन्न शिजवा.

सोडियम : सामान्यतः प्रक्रिया केलेले मांस, फास्ट फूड आणि पॅक्ड फूडमध्ये भरपूर सोडियम असते. याचे सेवन केल्याने शरीरात जळजळ होऊ शकते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. सोडियमच्या सेवनाची काळजी घ्या, ताजे आणि घरगुती अन्न खा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/NV6GcP1 Care Tips : लिंबू सौंदर्य वाढवतं, पण 'या' पद्धतीने वापरल्यास चेहराही खराब होऊ शकतो! तुम्हीही 'ही' चूक करताय का?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : पावसाळ्यात तुम्हीही वारंवार आजारी पडता का? 'हे' 5 खाद्यपदार्थ तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतातhttps://ift.tt/1eyWF4o
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : पावसाळ्यात तुम्हीही वारंवार आजारी पडता का? 'हे' 5 खाद्यपदार्थ तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतातhttps://ift.tt/1eyWF4o