Advertisement
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कोलंबियातील एका 10 वर्षाच्या मुलाने एका तासात 6 बाटल्या पाणी प्यायला. रे जॉर्डन असं या मुलाचं नाव असून तो आपल्या कुटुंबासह कोलंबियामध्ये राहतो. रे जॉर्डन त्याच्या चुलत भावांबरोबर खेळत होता, त्यामुळे त्याला खूप तहान लागली होती. तहान शमवण्यासाठी तो एका तासांत तब्बल 6 बाटल्या पाणी प्यायला.
आरोग्यावर झाला परिणाम
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 8 ते 9 च्या दरम्यान या मुलाने इतकं पाणी प्यायलं होतं, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू लागली. मुलाला इतकं पाणी पिताना पाहून आईलाही आश्चर्य वाटलं. मात्र, त्या वेळेस त्यांना इतकं काही जाणवलं नाही. रात्री पाणी प्यायल्यानंतर मुलाची प्रकृती बिघडू लागली. तो एखाद्या मद्यधुंद माणसासारखा बेशुद्ध लटपटत राहिला. त्याची प्रकृती इतकी बिकट झाली होती की त्याचा त्याच्या शरीरावर, हाता-पायांवर ताबाच ठेवता येत नव्हता. मुलाची अशी प्रकृती पाहता आई-वडिलांनी त्वरित त्याला डॉक्टरांकडे नेले.
वॉटर इंटॉक्सिकेशन झाल्याचं निदान
रुग्णालयात मुलावर तातडीच्या चाचण्या केल्या असता असे आढळून आले की, मुलाला पाण्याच्या नशेची समस्या म्हणजेच वॉटर इंटॉक्सिकेशन झालं आहे. ही अवस्था जास्त पाणी प्यायल्याने होते. जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊ लागते, ज्यामुळे उलट्या, मळमळ, डोक्यावर परिणाम यांसारख्या समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर अशा स्थितीत चक्कर येणे, कोमात जाणे आणि मृत्यूचा धोकाही वाढतो. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर आता मुलाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, वेळीच जर दखल घेतली नसती तर परिणाम वाईट होऊ शकले असते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
यारूनच हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, पाणी आरोग्यासाठी जरी वरदान असलं तरी मात्र किती प्रमाणात पाणी प्यावं हे ठरवणं फार गरजेचं आहे. पाण्याचं अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/SiVAqf5 Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सावधान! अतिपाणी शरीराठी घातक, तासाभरात प्यायला 6 पाण्याच्या बाटल्या, 10 वर्षीय मुलाची प्रकृती बिघडलीhttps://ift.tt/zxgQVJN
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सावधान! अतिपाणी शरीराठी घातक, तासाभरात प्यायला 6 पाण्याच्या बाटल्या, 10 वर्षीय मुलाची प्रकृती बिघडलीhttps://ift.tt/zxgQVJN