Advertisement

Baby Care In Monsoon : पावसाळा केवळ पाऊसच नाही तर अनेक आजारही घेऊन येतो. लहान मुलांची किंवा अर्भकांची प्रतिकारशक्ती फारच कमकुवत असते किंवा ती अजिबात विकसित झालेली नसते. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी मान्सून आणखीनच कठीण होऊन बसतो. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर या ऋतूत त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला पावसाळ्यात मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

मुलांना काय द्यावे?

मुलांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या मुलास फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचा समावेश असलेला पौष्टिक आहार द्या. तुम्ही त्याला लिंबूवर्गीय फळे, दही, हळद, आले आणि लसूणही खायला देऊ शकता. याशिवाय मुलाला स्वच्छ पाणी आणि ताज्या फळांचा रस द्या.

मुलांना वारंवार आजारी पडण्यापासून कसे थांबवाल?

स्तनपान करणाऱ्या आईने काय खावे?

जर तुमचे बाळ स्तनपान करत असेल तर पावसाळ्यात त्याला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आईच्या दुधामुळे बाळाला ऍन्टीबॉडीज मिळतात आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी त्याला जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात. स्तनपान देणाऱ्या मातांनी आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा, ज्यामध्ये हे सर्व पोषक तत्त्व असतात.

'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

ताप, अंगदुखी आणि शिंका येणे किंवा नाक वाहणे ही पावसाळ्यातील आजारांची सामान्य लक्षणं आहेत. ही विषाणूजन्य आजाराची सुरुवातीची लक्षणे देखील असू शकतात. बाळामध्ये ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मुलांना कोणते कपडे घालायचे?

पावसाळ्यात लहान बाळांना कोरडे आणि हलके उबदार कपडे घाला. पावसाळ्यात कपडे थोडे ओले होतात, त्यामुळे बाळाला कपडे घालण्यापूर्वी ते इस्त्री करा. यामुळे कपड्यांमधील ओलावा निघून जाईल. या ऋतूमध्ये, तुम्हाला बाळाची लंगोट अधिक वेळा तपासावी लागेल कारण ओल्या डायपरमुळे बाळाला पुरळ किंवा संसर्ग होऊ शकतो.

बाहेर जाणे टाळा

लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने त्यांना धुळीच्या ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका. ज्या ठिकाणी जास्त गवत वाढले आहे त्या ठिकाणापासून मुलांना दूर ठेवा कारण तेथे डास चावण्याची भीती असते. तसेच, गर्दीच्या ठिकाणी, संसर्गग्रस्त किंवा आजारी लोकांच्या संपर्कात येण्याचा धोका असतो. म्हणूनच मुलाला गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका. अनेक बालकांचे रोगांपासून संरक्षण करण्यातही लस फार महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे तुमच्या मुलास सर्व आवश्यक लस मिळवून द्या.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : पावसाळ्यात लहान बाळाची 'अशी' घ्या काळजी; प्रतिकारशक्ती वाढेल आणि आजारही होतील दूरhttps://ift.tt/Shy1YZo
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : पावसाळ्यात लहान बाळाची 'अशी' घ्या काळजी; प्रतिकारशक्ती वाढेल आणि आजारही होतील दूरhttps://ift.tt/Shy1YZo