Advertisement
Disadvantage Of Fruit Juice :  अनेकदा डाॅक्टर आपल्याला निरोगी राहण्याकरता रोज किमान एखादे फळ <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/aAnbrTm> किंवा फळाचा ज्यूस <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/ea6PQXJ Juice) पिण्याचा सल्ला देतात. बरेच लोक दिवसाची सुरुवात फळे खाऊन किंवा फळाचा ज्यूस पिऊन करतात. फळे आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात असे म्हटले जाते. फळांपासून आपल्याला भरपूर खनिजे आणि जीवनसत्त्वे तसेच कॅलरीज मिळतात. फळे शरीरासाठी देखील आवश्यक असतात त्यातील नैसर्गिक गोडवा आणि साखर शरीरासाठी फायदेशीर असते. मात्र सकाळी रिकाम्या पोटी फळ किंवा रस पिणे योग्य आहे का जाणून घेऊयात.
वजन कमी करण्याकरता फळ खाणे आहे लाभदायक
फळे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. फळामध्ये भरपूर फायबर असते जे पचनसंस्थेसाठी खूप चांगले असते. तसेच वजन कमी करण्यात आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यात फळाची भूमिका महत्त्वाची असते. फळांमध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स शरीरातील जुनाट आजार दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात . यामध्ये तुम्ही बेरी, सफरचंद, पीच, संत्री , मोसंबी आणि द्राक्षे खाऊ शकता. तुम्हाला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये कडधान्य, भरपूर पालेभाज्या, प्रथिने यांचा समावेश असणे शरीराच्या दृष्टीने गरजेचे आहे. फळे खाल्ल्याने लठ्ठपणा आणि आजारांचा धोकाही कमी होतो. फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला भरपूर आहार मिळतो. यासोबतच फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. फळांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात न घेता तुम्हाला लवकर ताजेतवाने वाटते.
फळांचा ज्यूस प्यावा कि नाही
फळांचा ज्यूस पिताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या की, ज्यूस फक्त एका फळापासून बनत नाही, त्यात अनेक फळे मिसळलेली असतात. जर तुम्हाला अनेक फळांची चव चाखायची असेल तर तुम्ही ज्यूस पिऊ शकता. पण फळांचा ज्यूस बनवल्यानंतर त्यातील फायबरचे प्रमाण कमी होते. फळांचा ज्यूस बनवताना त्यातील पोषक घटक देखील कमी होतात. त्यात असलेली साखर आणि कॅलरीजही वाढतात. बाजारात उपलब्ध असणारे पॅकेटमधील ज्यूस आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकतात. तुम्ही फळांचा ज्यूस ज्या वेळी पिता त्यावेळी त्यात असणारे सर्व फायबर नष्ट होतात. परिणामी शरीरातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते किंवा अचानकच खूप कमी होते. सतत फळाचा ज्यूस पिल्याने तुमचे वजन वाढण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात असतो. तुम्हाला फळे चावून खाणे आवडत नसल्यास तुम्ही फळांची स्मूदी देखील पिऊ शकता. 
इतर महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/RnHQhBm Tips : तुम्हीही ऑफिसमध्ये लोकांच्या People Pleaser चे बळी आहात का? नेमकी काय आहे ही समस्या; जाणून घ्या
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : फळं की फळांचा ज्यूस? आरोग्यासाठी फायदेशीर काय? जाणून घ्याhttps://ift.tt/acQ5CYV