Advertisement

Diabetic Retinopathy : मधुमेह ही सध्या सर्वात वेगाने वाढणारी शारीरिक समस्या आहे. यामुळे रक्तातील साखरेची झपाट्याने वाढ होतेच मात्र, जखमाही लवकर बऱ्या होत नाहीत. मधुमेहामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते, तुमच्या रक्तातील साखरेची वाढलेली पातळी तुमची दृष्टी हिरावून घेऊ शकते. म्हणजेच मधुमेहामुळे डोळ्यांच्या दृष्टीशी संबंधित समस्या देखील असू शकतात, ज्याला डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic Retinopathy) असं म्हणतात. ही समस्या नेमकी काय आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय?

डायबेटिक रेटिनोपॅथी मधुमेही रुग्णांची दृष्टी हिरावून घेऊ शकते. याचा परिणाम रेटिनातील रक्तवाहिन्यांवर होतो. मधुमेहामुळे होणाऱ्या या डोळ्यांच्या समस्येमध्ये रक्तवाहिन्या फुगतात आणि त्यातून गळती होण्याचा धोका असतो. या कारणामुळे, ते कमी दृश्यमान होतात. कालांतराने समस्या आणखी गंभीर होऊ शकते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा तरी डोळे तपासावेत असा सल्ला डॉक्टर देतात.

मधुमेह रेटिनोपॅथीचे कारण

रक्तातील साखरेची पातळी वाढणे आणि मधुमेहामध्ये डोळ्यांच्या समस्या हे त्याचे प्रमुख कारण आहे. उच्च रक्तातील साखर लहान रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणते आणि त्यामुळे डोळे नवीन रक्तवाहिन्या बनवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा या वाहिन्या व्यवस्थित तयार होत नाहीत, तेव्हा ते गळू लागतात. त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीचा त्रास सुरू होतो. मधुमेहाकडे योग्य लक्ष न देणे, उच्च रक्तदाब किंवा साखरेची पातळी सतत जास्त राहणे आणि मद्यपान, सिगारेटचे व्यसन यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

डायबेटिक रेटिनोपॅथीची लक्षणे

सुरुवातीला अनेक मधुमेही रुग्णांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीची लक्षणे दिसत नाहीत. पण, समस्या जसजशी वाढत जाते तशी दृष्टी धूसर होणे, दृष्टी कमी होणे, चक्कर येणे, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच मधुमेहावर वेळोवेळी उपचार करणं गरजेचं आहे.

मधुमेह रेटिनोपॅथीवर उपाय

1. मधुमेहामध्ये डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे डोळे तपासत राहा.
2. रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.
3. सकस आहार आणि निरोगी जीवनशैलीबरोबरच शारीरिक हालचाली, व्यायाम करत राहा.
4. आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस नियमित व्यायाम करा. जसे की, धावणे, चालणे किंवा सायकल चालवणे.
5. रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासत राहा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/7V5CzFI Tips : वयाच्या चाळीशीतही चेहऱ्यावर ग्लो हवाय? फक्त पाणी पिण्याचे 'हे' 5 नियम फॉलो करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सावधान! हा 'धोकादायक' आजार मधुमेहाच्या रुग्णांची दृष्टी हिरावून घेऊ शकतो; काळजी घ्याhttps://ift.tt/hoDxRLC
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सावधान! हा 'धोकादायक' आजार मधुमेहाच्या रुग्णांची दृष्टी हिरावून घेऊ शकतो; काळजी घ्याhttps://ift.tt/hoDxRLC