Advertisement

Health Tips : निरोगी राहण्यासाठी पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पाणी प्यायल्याने केवळ डिहायड्रेशनची समस्या दूर होत नाही तर बद्धकोष्ठता आणि शरीराशी संबंधित इतर अनेक समस्यांपासून सुटका मिळते. आरोग्य तज्ञ दररोज 8-10 ग्लास पाणी पिण्याची शिफारस करतात. उन्हाळ्यात जास्त तहान लागते. म्हणूनच आपण जास्त पाणी पितो. मात्र, जसजसे हवामान बदलते, तसतसे आपण पाणी पिणं टाळतो. पावसाळ्यात तर पाणी पिण्याचं प्रमाण फारच कमी होतं.

उन्हाळ्यात जितकी तहान लागते, तितकी तहान पावसाळ्यात लागत नाही. पावसाळ्यात लोक कमी पाणी पितात. पण, याचा अर्थ अजिबात नाही की तहान लागली नसेल तर पाणी पिऊ नये. पावसाळ्यात रोज किती पाणी प्यावे आणि का? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.

प्रत्येक ऋतूत स्वतःला हायड्रेटेड ठेवा

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, न्यूट्रिशनिस्ट तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, आपल्या शरीरात 70 टक्के पाणी गरजेचं आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा डिहायड्रेशनमुळे पेशी संकुचित होतात आणि योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. पेशींना त्यांचे कार्य व्यवस्थित करण्यासाठी भरपूर पाणी लागते. प्रत्येक ऋतूमध्ये व्यक्तीने स्वतःला हायड्रेटेड ठेवले पाहिजे.

पावसाळ्यात किती पाणी प्यावे?

पोषणतज्ञ सांगतात की जर तुम्हाला पित्ताची समस्या असेल तर तुम्ही स्वतःला थंड ठेवण्यासाठी दररोज तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यावे. तसेच, जर तुम्हाला कफ असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या पाणी शोषून घेता. जर तुम्ही वात प्रकृतीचे असाल तर तुम्हाला दिवसभर तहान लागत नाही आणि नंतर थकवा जाणवू शकतो. वात असलेल्या लोकांनी दररोज 8 ग्लास पाणी प्यावे. पाणी वात काढून टाकते. हे पित्त दोष संतुलित करते आणि कफ वाढण्यास प्रतिबंध करते.

भरपूर पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर होतात

उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा, प्रत्येक ऋतूत भरपूर पाणी प्यावे. कारण बदलत्या हवामानाबरोबरच अनेक आजारांचा धोकाही वाढतो आणि त्यापासून बचाव करण्यासाठी पाणी तुम्हाला खूप मदत करू शकते. पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यकृत, पोट आणि किडनीशी संबंधित समस्या कमी होतात. एकंदरीत, कोणत्याही ऋतूत पाणी पित राहावं. तुम्हाला तहान लागली नसली तरीही, स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी प्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/U1VhDFv Beauty Benefits : तूप खाऊन येईल रुप... ग्लोईंग त्वचा आणि डार्क सर्कलपासून सुटका हवीय, तुपाचा असा करा वापर

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : पावसाळ्यात किती ग्लास पाणी पिणं शरीरासाठी योग्य आहे? वाचा तज्ज्ञांचा सल्लाhttps://ift.tt/hoDxRLC
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : पावसाळ्यात किती ग्लास पाणी पिणं शरीरासाठी योग्य आहे? वाचा तज्ज्ञांचा सल्लाhttps://ift.tt/hoDxRLC