Advertisement

Shravan 2023 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. यंदा अधिकमास येत असल्याने हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना (Shravan 2023) सुमारे दोन महिन्यांचा असेल. श्रावण महिना 18 जुलै 2023 पासून सुरू होत असून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत चालेल. पण, महाराष्ट्रात जरी श्रावण 18 जुलै पासून सुरु होत असला तरी उत्तर भारतात 4 जुलै पासून श्रावण महिना सुरु होतोय. श्रावण महिना हा भक्तीचा आणि उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो. या श्रावणात तुम्हाला देखील पवित्र अशा तीर्थक्षेत्रांना भेट द्यायची असेल तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला काही प्रसिद्ध अशा स्थळांची नावं सांगणार आहोत.

श्रावण महिना जसजसा जवळ येत चालला आहे तसतसा भाविकांचा उत्साह वाढत चालला आहे. 4 जुलैपासून सुरु होणारा हा महिना 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अर्थात अधिक मास असल्या कारणाने जवळपास दोन महिने श्रावण असणार आहे. उत्तर भारतात देखील श्रावण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या ठिकाणी भगवान शंकराला लोक विशेष मानतात. या ठिकाणी भगवान शिवाची पूजा करून आशीर्वाद मिळवून साजरा केला जातो.

श्रावणात भेट देण्यासाठी 5 प्रसिद्ध धार्मिक स्थळांची यादी

1. वाराणसी, उत्तर प्रदेश

गंगा नदीच्या काठावर वसलेले, बनारस किंवा वाराणसी या प्राचीन शहराला कोणत्याही वेगळ्या अशा ओळखीची गरज नाही. इथल्या घाटापासून ते मंदिरापर्यंत, शहराला इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा अभिमान आहे. श्रावण महिन्यात इथल्या काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आणि आरती पाहण्यासाठी देशांतील विविध कानाकोपऱ्यांतून भाविक या शहराला भेट देतात.

2. हरिद्वार/ऋषिकेश, उत्तराखंड

श्रावण महिन्यात 'कंवर' म्हणून ओळखले जाणारे भक्त देशाच्या कानाकोपऱ्यांतून पायी प्रवास करून मंदिरांना भेट देतात आणि गंगा नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करतात. श्रावणाच्या उत्सवात तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही देखील उत्तराखंड राज्यात असलेल्या या दोन ठिकाणांना भेट देऊ शकता.

3. देवघर, झारखंड

झारखंड राज्यातील सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणजे देवघर हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी बाबा वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी यात्रेकरू फार दूरवरून येतात. या ठिकाणचं हे यात्रेकरूंचं प्रमुख केंद्र आहे.

4. उज्जैन, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे. या ठिकाणाला भगवान शंकराचे सर्वात पवित्र निवासस्थान मानले जाते.

5. तारकेश्वर, पश्चिम बंगाल

तारकेश्वर हे पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील एक छोटेसे शहर आहे. बंगाली भाषेत याला 'बाबर धाम' म्हटले जाते. ज्याचा अर्थ 'शंकराचे शहर' आहे. तारकेश्वर कोलकात्यापासून 58 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी ट्रेन किंवा बसने सहज पोहोचता येते.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Shravan 2023 : 'या' तारखेपासून सुरु होतोय श्रावण महिना; यंदाच्या श्रावणात भगवान शंकराच्या 'या' 5 पवित्र स्थळांना नक्की भेट द्याhttps://ift.tt/gQcW2lN
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Shravan 2023 : 'या' तारखेपासून सुरु होतोय श्रावण महिना; यंदाच्या श्रावणात भगवान शंकराच्या 'या' 5 पवित्र स्थळांना नक्की भेट द्याhttps://ift.tt/gQcW2lN