Advertisement

Fasting Benefits :  हिंदू धर्मात श्रावणाला (Shravan) फार महत्व आहे. या महिन्यात शंकराची पूजा केली जाते. येत्या 18 जुलैपासून श्रावणाला सुरुवात होत आहे. श्रावण महिना देशभरातील लोकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या संपूर्ण महिन्यात येणार्‍या सर्व सोमवारी बहुतेक महिला आणि पुरुष उपवास ठेवतात. अनेक स्त्रिया संपूर्ण श्रावणाच्या प्रत्येक दिवशी भगवान शंकराची पूजा करतात आणि पाणी, दूध आणि बेलची पाने अर्पण करतात. यंदा अधिकमास येत असल्याने हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना दोन महिन्यांचा असणार आहे. एवढेच नाही तर या संपूर्ण महिन्यात लोक सात्विक भोजन करतात. याचे शरीराला अनेक फायदे होतात.

श्रावण महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ असते. या ऋतूत वातावरणातील आर्द्रताही वाढते. या आर्द्रतेमुळे पचनसंस्था कमकुवत होते. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. यामुळेच या ऋतूमध्ये पोट खराब होणे, अपचन, ऍसिडिटी, अन्नातून विषबाधा (Food Poisoning) अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.

श्रावणात उपवास करणे का गरजेचे आहे?

श्रावणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेक आजार बळावतात. पोटांच्या बऱ्याच समस्या देखील पावसाळ्याच्या ऋतूतच होतात. श्रावणात उपवास केल्याने रोजच्या खाण्यात पालेभाज्यांचा समावेश केला जात नाही. यामुळे तुम्ही संसर्गजन्य आजारांपासून दूर राहू शकता.

श्रावणात उपवास करण्याचे काय फायदे आहेत (Benefits Of Fasting)

आयुर्वेदानुसार जर तुम्ही श्रावण महिन्यात एक दिवसही उपवास ठेवलात तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या येत नाहीत. असे केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात. पोटदुखी , गॅस, अॅसिडिटीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.तसेच उपवास केल्याने भूक चांगली लागते तर वजन कमी होण्यास देखील मदत होते. उपवासाच्या वेळी द्रव पदार्थ जास्त खाल्ले जातात यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. तुमच्या रोजच्या आहाराचा थेट परिणाम हा त्वचेवर होतो. उपवासात बाहेरचे जंक फूड खाल्ले जात नाही. सोबतच मसालेदार पदार्थ देखील खाल्ले जात नाही. यामुळे त्वचा चांगली राहते. उपवास केल्याने कोलेस्टेरॉलचा धोकाही कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपवास अत्यंत फायदेशीर मानला जातो. तसेच उपवासामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणीत राहण्यास मदत होते.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/09zbl1c Nap : वामकुक्षी घेताय? दुपारची झोप मेंदूसाठी घातक की फायदेशीर? संशोधनात मोठी बाब उघड

(Dislmaier: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. आहारतज्ज्ञ, डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा)

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Shravan 2023: श्रावणात उपवास करणे आरोग्याच्या दृष्टीने आहे लाभदायक; वाचा सविस्तरhttps://ift.tt/DUNzKcq
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Shravan 2023: श्रावणात उपवास करणे आरोग्याच्या दृष्टीने आहे लाभदायक; वाचा सविस्तरhttps://ift.tt/DUNzKcq