Advertisement

Tobacco Side Effects: 'तंबाखूचं सेवन शरीरासाठी हानिकारक आहे'... ही ओळ आपल्या कानावर अनेकदा पडली असेल. तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल अनेक वेळा लोकांना सतर्क केलं जातं, परंतु फार कमी लोकांवर त्याचा परिणाम होतो. गुजरातमधून (<a href="https://ift.tt/9SVca0w) एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे आईच्या तंबाखू (Tobacco) सेवनाचा परिणाम तिच्या नवजात बाळावर दिसून आला आहे. या नवजात बाळाचं संपूर्ण शरीर निळं पडलं होतं आणि त्याच्यात सामान्य प्रतिक्रियाही दिसत नव्हती. नवजात बालकामध्ये निकोटिनचं (Nicotine) प्रमाण जास्त असल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं आणि त्यामुळे बाळामध्ये ही लक्षणं दिसून आली.

आईला होती तंबाखू खाण्याची सवय

डॉक्टरांच्या मते, मुलाच्या रक्तप्रवाहात निकोटिनचं प्रमाण जास्त असण्याचं कारण म्हणजे बाळाच्या आईला तंबाखू खाण्याची सवय होती. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, जन्मानंतर बाळामध्ये 60 एनजी/एमएल निकोटिनचे प्रमाण होते. जे प्रौढांमधील निकोटिनच्या सामान्य प्रमाणापेक्षा 3 हजार पट जास्त आहे आणि हे आरोग्यासाठी फार धोकादायक आहे.

आईला होता दम्याचा त्रास

डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, बाळाच्या आईला दम्याचा त्रास होता आणि ती फार प्रमाणात तंबाखू खात होती. ती दिवसभरात गुटखा-तंबाखूची 10 ते 15 पाकिटं संपवायची, त्यामुळे पोटात वाढत असलेल्या बाळामध्ये रक्तप्रवाहाद्वारे निकोटिनचं प्रमाण खूप वाढलं. मेडिकल रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, आईला वयाच्या 15 व्या वर्षापासून तंबाखू खाण्याची सवय होती. तरी, पाच दिवसांच्या उपचारांनंतर तिच्या बाळाच्या आरोग्यात सुधारणा दिसली आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला.

स्त्रीरोग तज्ज्ञ काय म्हणतात?

तंबाखू आणि धूम्रपानामुळे महिलांवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत बोलताना स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणाले, गरोदरपणात धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन केल्यास त्याचा बाळावर वाईट परिणाम होतो. यापूर्वीही असे अहवाल समोर आले आहेत, म्हणूनच गरोदरपणात महिलांनी धूम्रपान करू नये आणि दारू पिऊ नये. अशा महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो.

धूम्रपानामुळे महिलांना कोणत्या समस्या उद्भवतात?

1. धुम्रपान करणाऱ्या महिलांना गरोदर राहण्यात समस्या येतात.
2. गर्भधारणेदरम्यान धूम्रपान केल्याने पोटात वाढत असलेल्या बाळाच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते. त्याचे दुष्परिणाम बाळाच्या फुफ्फुस आणि मेंदूवर दिसून येतात.
3. तंबाखू आणि धूम्रपानामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी ओठ आणि तळवे कापले जाऊ शकतात.

गरोदरपणात दारू पिणं किती धोकादायक?

1. गरोदरपणात मद्यपान केल्याने गर्भपात, अकाली जन्म आणि बाळाचे वजन कमी होण्याचा धोका वाढतो.
2. मुलाच्या जन्मानंतर मुलाच्या विकासावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
3. गर्भधारणेदरम्यान मद्यपान केल्याने मुलामध्ये अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर होऊ शकतो.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/JGg7AY1 Tips: सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात लिंबू पिळून प्यावं; आरोग्यावर होतात 'हे' सकारात्मक परिणाम

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Tobacco: तंबाखूचं सेवन करत होती आई, जन्मानंतर नवजात बाळामध्ये मिळाले निकोटिनचे अंश; डॉक्टरही चक्रावलेhttps://ift.tt/acQ5CYV
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Tobacco: तंबाखूचं सेवन करत होती आई, जन्मानंतर नवजात बाळामध्ये मिळाले निकोटिनचे अंश; डॉक्टरही चक्रावलेhttps://ift.tt/acQ5CYV