Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २४ जुलै, २०२३, जुलै २४, २०२३ WIB
Last Updated 2023-07-24T16:48:36Z
careerLifeStyleResults

World Heritage Sites :40 पैकी पाच जागतिक वारसा स्थळं महाराष्ट्रात, अशी आहे यादी

Advertisement

Tourist places in Maharashtra : राज्याच्या दृष्टीने त्याची संस्कृती आणि नैसर्गिक विविधता ही त्याला एक वेगळी ओळख निर्माण करुन देत असते. ते पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येत असतात. त्यातही राज्यातील ठिकाणं ही जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असतील तर त्याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. आपल्या देशात एकूण 40 ठिकाणांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच ठिकाणांचा समावेश आहे. UNESCO च्या संकेतस्थळावर ही यादी पहायला मिळते.

देशाचा विचार करता एकूण 40 ठिकाणाचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश आहे. त्यामध्ये सांस्कृतिक विभागात 32 तर नैसर्गिक विभागात सात ठिकाणांचा आणि एका ठिकाणाचा मिक्स प्रकारच्या यादीत समावेश आहे.

महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळं

अजिंठा लेणी

प्राचीन चित्रकलेसाठी प्रसिद्ध असणारी अजिंठा लेणी महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आहे.औरंगाबाद शहरापासून 100 किलोमीटरवर वाघूर नदीच्या परिसरात या लेण्या आहेत. UNESCO या संस्थेने 1983 साली जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला. बौद्ध धर्मातील हिनयान आणि महायान पंथियांचे लेणी साहित्य येथे आहे. ही लेणी पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून तसेच इतर ठिकाणावरून असंख्य पर्यटक येत असतात.

वेरूळची लेणी

इसवी सण 1951 रोजी भारत सरकारने वेरूळच्या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले तर UNESCO या संस्थेने 1983 साली जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला. पाचव्या ते दहाव्या शतकातील कोरलेल्या औरंगाबाद शहरापासून अगदी 30 किलोमीटरवर वेरूळची 34 लेण्या आहेत. बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मातील लेणी एकाच ठिकाणी पाहण्यास मिळतात.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ज्याला व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हिटी) किंवा सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाते. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेक सुवर्णजयंतीच्या निमित्ताने इसवी सन 1887 मध्ये याची निर्मिती झाली. UNESCO या संस्थेने 2004 साली जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला.

मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल

व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ बॉम्बे हा मुंबईच्या किल्ल्या परिसरात 19व्या शतकातील व्हिक्टोरियन रिव्हायव्हल सार्वजनिक आणि 20व्या शतकातील मुंबई आर्ट डेको खाजगी इमारतींचा संग्रह आहे. या जोडणीला 2018 मध्ये UNESCO जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.

एलिफंटा केव्ह्ज

एलिफंटा लेणी  मुंबई शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर घारपुरी बेटावर आहेत. 1987  मध्ये, एलिफंटा लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. मनोरंजक आणि आश्चर्यकारक एलिफंटा लेणी मध्ययुगीन रॉक-कट कला आणि वास्तुकलाचा एक भव्य नमुना आहे.

नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांची यादी

काझिरंगा नॅशनल पार्क- आसाम 1985

केवलागदेव-घाना नॅशनल पार्क- राजस्थान 1985

मानस वाईल्डलाईफ सॅन्चुरी- आसाम, 1985

नंदा देवी नॅशनल पार्क, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स- उत्तराखंड, 1988,2005

सुंदरबन नॅशनल पार्क- पश्चिम बंगाल, 1987

पश्चिम घाट- महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ, 2012

ग्रेट हिमालयीन नॅशनल पार्क- हिमाचल प्रदेश, 2014

सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी

ताजमहल- उत्तर प्रदेश, 1983

वेरुळ लेण्या- महाराष्ट्र, 1983

अजंठा लेण्या- महाराष्ट्र 1983

आग्रा किल्ला- उत्तर प्रदेश, 1983

सूर्य मंदिर कोणार्क- ओडिशा- 1984

महाबलीपूरम- 1984

खजुराहो लेण्या- मध्य प्रदेश- 1986

फत्तेपूर सिक्री- उत्तर प्रदेश, 1986

गोव्यातील चर्चेस- गोवा, 1986

पट्टदकलमधील मंदिरे- कर्नाटक, 1987

चोल राजांची मंदिरे- तमिळनाडू, 1987

एलेफंटा केव्ह्ज- महाराष्ट्र, 1987

सांची स्तूप- मध्य प्रदेश, 1989

कुतुब मिनार- दिल्ली, 1993

हुमायूनची कबर- दिल्ली, 1993

भारतातील पर्वतीय रेल्वे- निलगिरी, तामिळनाडू, 1999

महाबोधी मंदिर- बोध गया, बिहार, 2002

भीमबेटका- मध्य प्रदेश, 2003

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मुंबई, महाराष्ट्र, 2004

चंपानेर-पावागढ उद्यान- गुजरात, 2004

लाल किल्ला- दिल्ली, 2007

राणी की बाव- गुजरात, 2014

नालंदा विश्वविद्यालय (महाविहार)- बिहार, 2016

जयपूर पिंक सिटी- राजस्थान, 2020

अहमदाबाद- गुजरात, 2017

व्हिक्टोरियन अॅन्ड आर्ट डेको एन्सेम्बल- मुंबई, 2018

चंदीगड शहर- चंदीगड, 2016

काकतिया मंदिर (रामप्पा) मंदिर- तेलंगना, 2021

ढोलविरा- गुजरात, 2021

मिश्र विभागातील स्थळ

कांचनगंगा नॅशनल पार्क- सिक्किम, 2016

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/Qhq9CsN Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्हीही गरम पाणी आणि लिंबू पितात का? जाणून घ्या फायदे

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: World Heritage Sites :40 पैकी पाच जागतिक वारसा स्थळं महाराष्ट्रात, अशी आहे यादीhttps://ift.tt/F4oCDkn