Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट ०९, २०२३ WIB
Last Updated 2023-08-09T13:49:27Z
careerLifeStyleResults

डोळे आलेल्या व्यक्तीकडे पाहिल्यावर डोळे येत नाहीत, पाहा काय म्हणाले डॉ अविनाश भोंडवे

Advertisement

Conjunctivitis: मागील काही दिवसांपासून राज्यात साथीच्या रोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. थंडी, ताप, खोकला, अंगदुखी यासारखा आजारासोबत डोळ्याच्या आजारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे दिसत आहे. डोळे आलेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहिल्यानंतर आपल्याला डोळे येतील, असा अनेकांचा गैरसमज आहे. डॉ अविनाश भोंडवे यांनी डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहिल्यानंतर डोळे येत नाहीत, असे स्पष्ट शब्दात सांगितले. डोळे आलेल्या माणसांकडे बघितले की आपल्याला डोळे येतात असं नाही. त्यांनी ज्या ठिकाणी हात लावला आहे, तिथे आपण हात लावला आणि मग त्याच हाताने जर आपल्या डोळ्यांना स्पर्श केला तर डोळे येऊ शकतात. डोळे आले की डोळे चुरचुरतात, आग होणे, पाणी येणे, प्रकाशाकडे बघता न येणे अशा गोष्टी होतात. पण 5 दिवसांत बरं वाटायला लागतं. आयड्रॉप वापरण्याची गरज पडेलच असं नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग औषधे घ्यावीत, असे डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सांगितले.  डोळे वरचेवर स्वच्छ पाण्याने धुतल्यास आणि स्वच्छ कपड्याने साफ करत राहिल्यास औषध वापरायची गरज पडत नाही, असेही भोंडवे यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून राज्यात साथीच्या रोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. थंडी, ताप, खोकला, अंगदुखी यासारखा आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे दिसत आहे. व्हायरल इन्फोक्शन म्हणजे ताप सर्दी खोकला होणे होय. अशा प्रकारचे रुग्ण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. पण अशावेळी घाबरुन जाऊ नका, असे आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांचे प्रमाण 15-20 टक्के  इतके आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तितकी वाढ नाही. 50 रुग्णांमध्ये 10 रुग्णांना डेंग्यू आहे. मात्र डोळे येण्याची साथ आलेली आहे. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये 15 टक्के रुग्णांना डोळे आल्याचं बघायला मिळतेय, असे डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सांगितले. सध्या वातावरणामुळे हे बदल बघायला मिळत आहेत. स्वच्छतेचे पालन करणे, हात पाय स्वच्छ धुण्यासह स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतल्यास साथीच्या आजारावर मात करता येईल.

सध्या असं बघायला मिळतंय की दिवसा ताप येतो. रात्रीपर्यंत उतरतो आणि पुन्हा संध्याकाळी ताप येतो. असं झालं तर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. व्हायरल सध्या गोळ्यांनी नीट होऊ शकते, त्यासाठी अँटीबायोटिक घ्यायची गरज नाही. कोणताही साथीचा आजार झाल्यास पाच दिवसात बर वाटते, त्यामुळे घाबरून जायची गरज नाही, असे अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

काय आहेत लक्षणे?
दिवसात २ वेळेला ताप येणे
बारीक थंडी
खोकला

खबरदारी कशी घ्यावी?
मास्क वापरणे
स्वच्छता राखणे
डॉक्टरचा सल्ला घेणे
गरम पाण्याने गुळण्या करणे

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: डोळे आलेल्या व्यक्तीकडे पाहिल्यावर डोळे येत नाहीत, पाहा काय म्हणाले डॉ अविनाश भोंडवेhttps://ift.tt/zCWnGHN