Advertisement
'आर्किटेक्चर (Architecture)' म्हणजे काय ?आर्किटेक्चर म्हणजे ‘वास्तुरचनाशास्त्र’ किंवा ‘स्थापत्यशास्त्र’. या शास्त्रात कला आणि विज्ञान शाखेचा संगम असतो. यात कला, कौशल्य आणि टेक्नोलॉजीचा वापर करून उच्च प्रतीची सुंदर कलाकृती तयार केली जाते. पाच वर्षे कालावधीचा बी. आर्किटेक्चर हा पदवी अभ्यासक्रम असतो. तर, एम. आर्किटेक्चर या पदव्युत्तर अभ्यासक्रमात पंधरा ते वीस विषयांत स्पेशलायझेशन उपलब्ध आहे. सध्या महानगरांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ विषयक प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात आर्किटेक्चर क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होणार यात शंका नाही.
source https://maharashtratimes.com/career/career-news/build-your-path-as-architect-read-this-important-information-which-will-help-you-to-fulfill-your-career/articleshow/102781393.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/build-your-path-as-architect-read-this-important-information-which-will-help-you-to-fulfill-your-career/articleshow/102781393.cms