Advertisement

Disease X: आजकाल डिसीज एक्स (Disease X) नावाचा आजार सोशल मीडियावर (Social Media) खूप ट्रेंड करत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)नं डिसीज X हा संभाव्य आणि घातक आजार म्हणून घोषित केला आहे. दरम्यान, अद्याप या आजाराचा एकही रुग्ण अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, सध्या वैज्ञानिक प्राण्यामध्ये आढळून येणारे असे व्हायरस जे मानवी शरीरापर्यंत पोहोचणारे अनेक व्हायरस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.

डिसीज X ठरू शकतो धोकादायक

एव्हीयन फ्लू हा या प्राणघातक विषाणूंपैकी एक आहे, ज्यामुळे मानवांसाठी धोका निर्माण होऊ शकतो. मानव प्रजातीला हानी पोहोचवणाऱ्या या जोखमींचं निरीक्षण आणि निराकरण करण्यासाठी शास्त्रज्ञ सतत कार्यरत असतात. 2018 च्या अहवालात असंही नमूद केलं आहे की, डिसीज X हा जगासाठी सर्वात मोठा संसर्गजन्य आजार ठरू शकतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे की, डिसीज X हा माकड, कुत्रे यांसारख्या कोणत्याही प्राण्यापासून पसरू शकतो. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, डिसीज X हा धोकादायक आजार असू शकतो. तसेच, इबोला, एचआयव्ही एड्स, कोविड सारख्या रोगांचा प्रसार करून मानवांना संक्रमित करू शकतो.

लसीचा शोध सुरू

NDTV च्या अहवालानुसार, प्राधान्य रोगांच्या छोट्या यादीमध्ये त्या रोगांची नावं आहेत, जी पुढील प्राणघातक महामारीचं कारण बनू शकतात. यापैकी बहुतेक रोगांबद्दल आपल्याला आधीच माहिती आहे. जसं- इबोला, कोविड आणि झिका व्हायरस. या यादीत आणखी एक नाव आहे. ते नाव म्हणजे, डिसीज X ज्यानं वैज्ञानिकांसह सर्वांचंच टेंशन वाढवलं आहे.

मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, हा आजार रोखण्यासाठी काम सुरू करण्यात आलं आहे. शास्त्रज्ञ नवा आजार डिसीज X नष्ट करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. हे टाळण्यासाठी लस आणि उपचारांचा शोधही सुरू झाला आहे.

भविष्यात कोरोनाहून घातक महामारीचा धोका

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी उघड केलं आहे की, 100 दिवसांच्या आत प्राणघातक महामारी थांबविण्यासाठी लस तयार करण्याच्या कामात ब्रिटीश शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. भविष्यात कोरोनाहून घातक महामारीविरोधात लढण्यासाठीची ही पाऊलं आहेत. विल्टशायरमधील सरकारच्या उच्च सुरक्षा पोर्टन डाउन लॅब कॉम्प्लेक्समध्ये ही लस तयार करण्याचं काम सुरु आहे. 200 हून अधिक शास्त्रज्ञांची टीम यासाठी काम करत आहे.

डिसीज X म्हणजे काय?

2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) "डिसीज एक्स" नावाच्या अज्ञात आजारामुळे मानवजातीचा संपूर्ण नाश होण्याचा अंदाज वर्तवला होता. डिसीज एक्स अर्थात रोग एक्स म्हणजे आणि हे नाव कसं पडलं हे जाणून घ्या. डब्ल्यूएचओच्या शास्त्रज्ञांनुसार एक्स रोगामुळे भविष्यात जागतिक महामारी होऊ शकते. हा अज्ञात रोग डब्ल्यूएचओच्या रोगांच्या ब्लूप्रिंट यादीचा एक भाग आहे. एक्स रोग हा नेमका कोणत्या विषाणूमुळे पसरले हे अद्याप स्पष्ट नाही.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Disease X: 'डिजीज X' आहे तरी काय? जगावर घोंगावतोय महामारीचा धोका; WHO नं जारी केलाय अलर्टhttps://ift.tt/CjrdpDl
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Disease X: 'डिजीज X' आहे तरी काय? जगावर घोंगावतोय महामारीचा धोका; WHO नं जारी केलाय अलर्टhttps://ift.tt/CjrdpDl