Advertisement

<a href="https://ift.tt/iwWy7Vz Hair Care Tips : पावसाळ्यात (Monsoon) आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे इन्फेक्शन (Viral Infection) आणि आजारांचा धोका असतो. यासोबत केसांच्या समस्याही (Hair Problems) खूप वाढतात. पावसाळ्यात केस गळणे आणि तुटणे यामुळे बहुतेक जण त्रस्त असतात. तुम्हीही केस तुटणे आणि केस गळती यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर, यापासून आराम मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या तेल आणि प्रोडक्ट वापरण्यापेक्षा घरगुती उपाय करुन पाहा.

पावसाळ्यात आरोग्यासोबतच केसांची योग्य काळजी आणि निगा राखणेही आवश्यक आहे. पावसाळा ऋतूमध्ये केस गळण्याची समस्या सामान्य आहे. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी तेल तयार करुन केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. तुम्हीही आयुर्वेदिक पद्धतींनी तुमचे केस मजबूत करु शकतात आणि ते ही घरी. ते नेमकं कसं जाणून घ्या

भृंगराज कडुनिंब तेल

1 कप नारळाचं तेल

2 कप तीळ तेल

1/2 कप एरंडेल तेल

4 चमचे ब्राह्मी पावडर

3 चमचे भृंगराज पावडर

7 ते 8 कडुलिंबाची पाने ठेचून

7 ते 8 कढीपत्ता पाने ठेचून किंवा चूर्ण

1 टीस्पून मेथी दाणे

2 चमचे आवळा पावडर

4 जास्वंदाची फुले

2 दोन चमचे मेथी दाणे

तेल तयार करण्याची पद्धत

तेल बनवण्यासाठी सर्वात आधी जाड तळ असलेली कढई घ्या आणि गॅसवर ठेवा. यासाठी लोखंडी कढई घेतल्यास अधिक फायदेशीर ठरेल.

आता यात खोबरेल तेल, तिळाचे तेल, एरंडेल तेल घालून थोडा कोमट होऊ द्या. आता यामध्ये मेथी दाणे घाला.

त्यानंतर इतर सर्व साहित्य एक-एक करून तेलात टाका.

मंद आचेवर हे तेल 10 मिनिटे ठेवा.

तेलाचा रंग बदलल्यावर गॅस बंद करा.

आता हे तेल गाळून काचेच्या बाटलीत ठेवा.

केसांच्या समस्येवर रामबाण उपाय असणारं घरगुती केसांचे तेल तयार आहे.

तेल वापरण्याची पद्धत

हे तेल वापरण्याआधी डबल बॉयलर पद्धतीने कोमट करा आणि त्यानंतर केसांना लावा. किमान पाच मिनिटे केसांना हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर किमान 45 मिनिटे ते एक तास हे तेल केसांना लावून ठेवा. यानंतर तुम्हील शॅमपूने केसं धुवू शकता. तुम्ही हे तेल रात्री केसांना लावून रात्रभर ठेवू शकता, त्यानंतर सकाळी उठल्यावर शॅम्पूने केस धुवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

इतर संबंधित बातम्या

<a href="https://ift.tt/AHF5X1l Hair Mask : कुरळ्या केसांना मुलायम बनवा, 'हे' हेअर मास्क वापरून पाहा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, 'हे' घरगुती केसांचं तेल वापरून पाहाhttps://ift.tt/CjrdpDl
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, 'हे' घरगुती केसांचं तेल वापरून पाहाhttps://ift.tt/CjrdpDl