Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट २९, २०२३ WIB
Last Updated 2023-08-28T18:49:45Z
careerLifeStyleResults
Health Tips: आहारात मीठाचा समावेश टाळा; हृदयविकाराचा धोका 20 टक्क्यांनी होईल कमी
Advertisement
Health Tips: आहारात मिठाचा (Salt) समावेश न केल्यास किंवा कमी प्रमाणात मिठाचं सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका पाचपटीने कमी होऊ शकतो, असं एका अभ्यासातून आढळून आलं आहे.
मिठाचा अतिवापर केल्यास हृदयविकाराचा धोका
दक्षिण कोरियातील क्यूंगपूक नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासानुसार, जे लोक नेहमी त्यांच्या अन्नात मीठ घालतात त्यांना एट्रियल फायब्रिलेशनची किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 22 टक्के जास्त असते. जे अन्नात मीठाचा वापर कधीही करत नाहीत किंवा कमी प्रमाणाच मीठ वापरतात, त्यांना हृदयविकाराचा धोका तितका नसतो.
क्यूंगपूक नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे प्रमुख संशोधक यून जंग पार्क म्हणाले, “आमच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, पदार्थांमध्ये मीठाचं सेवन कमी करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो."
मिठाचा वापर कमी केल्यास हृदयविकाराचा धोका 12 टक्के कमी
गेल्या आठवड्यात अॅमस्टरडॅममध्ये झालेल्या युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी कॉन्फरन्समध्ये सादर केलेल्या अभ्यासासाठी, टीमने 40 ते 70 वयोगटातील 3 लाख 95 हजार 682 लोकांचा डेटा तपासला, ज्यांचं रुटिन 11 वर्षांसाठी तपासलं गेलं. या अभ्यासातील निष्कर्ष असंही सूचित करतो की, आहारात मीठाचा वापर कमी केल्याने हृदयविकाराचा धोका 12 टक्क्यांनी कमी झाला.
“जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबासह आरोग्य समस्या उद्भवू शकतात, हे सर्वज्ञात आहे. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्याचा धोका वाढण्याबरोबरच, उच्च रक्तदाबामुळे तुमच्या हृदयाचे नुकसान होऊ शकते आणि यामुळे अॅट्रियल फायब्रिलेशन होऊ शकते,” ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे प्रोफेसर जेम्स लीपर म्हणाले.
जास्त मीठ खाल्ल्याने मृत्यूचाही धोका
मीठातील सोडियम हे एक आवश्यक पोषक घटक आहे, परंतु जास्त मीठ खाल्ल्याने ते आहार आणि पोषण-संबंधित मृत्यूसाठी कारण ठरतं. सोडियमचा मुख्य स्त्रोत टेबल मीठ (सोडियम क्लोराईड) आहे, परंतु ते सोडियम ग्लूटामेट सारख्या इतर मसाल्यांमध्ये देखील समाविष्ट आहे.
डब्ल्यूएचओकडून देखील मिठाचं सेवन कमी करण्याचं आवाहन
मार्चच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) लोकांना मिठाचं सेवन कमी करण्यासाठी 'मोठ्या प्रमाणावर प्रयत्न' करण्याचं आवाहन केलं होतं, जेणेकरुन हृदयाच्या समस्या, स्ट्रोक आणि कर्करोगाचा धोका टाळता येईल.
'मिठाचा वापर टाळल्यास सात दशलक्ष जीव वाचू शकतात'
सोडियमचं सेवन कमी करण्याबाबतच्या आपल्या प्रकारच्या पहिल्या जागतिक अहवालात, जागतिक आरोग्य संस्थेने असं नमूद केलं आहे की, 2025 पर्यंत सोडियमचं सेवन 30 टक्क्यांनी कमी करण्याचं जागतिक लक्ष्य गाठण्यासाठी लोक अजून दूर आहेत. अहवालातून असं दिसून आलं आहे की, केवळ 5 टक्के देश मीठाचा वापर करणं टाळत आहे किंवा कमी प्रमाणात मीठ वापरत आहे. तर भारतासह 73 टक्के देशांना अशा धोरणांच्या सक्त अंमलबजावणीची गरज आहे. सोडियम कमी करण्याच्या धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास 2030 पर्यंत जागतिक स्तरावर अंदाजे सात दशलक्ष जीव वाचू शकतात, असं WHO नं म्हटलं आहे.
हेही वाचा:
<a href="https://ift.tt/7uTtjhX Covid Variant: कोरोनाचा कमबॅक; अमेरिकेसह अनेक देशांत आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, 'ही' आहेत लक्षणं
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips: आहारात मीठाचा समावेश टाळा; हृदयविकाराचा धोका 20 टक्क्यांनी होईल कमीhttps://ift.tt/5EILOZq