Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, २० ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट २०, २०२३ WIB
Last Updated 2023-08-20T06:49:49Z
careerLifeStyleResults

Health Tips : तुम्हालाही छोट्या-छोट्या गोष्टी विसरण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा, 'या' आजाराचं असू शकतं लक्षण

Advertisement

Health Tips : आजच्या व्यस्त जीवनात वाढता ताण आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोक अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टी विसरू लागले आहेत. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर तुम्ही ब्रेन फॉग (Brain Fog) या आजाराचे बळी पडण्याची शक्यता आहे. ब्रेन फॉग ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीला मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. या स्थितीमुळे व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. तसेच, रोजच्या जीवनात कामावर लक्ष केंद्रिक करणंही कठीण होतं. ब्रेन फॉग असलेल्या व्यक्तींना एकाच कामावर दीर्घ कालावधीसाठी लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. ब्रेन फॉग म्हणजे नेमकं काय? आणि हा कसा होतो? ब्रेन फॉक टाळण्यासाठी उपाय काय? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

ब्रेन फॉग म्हणजे काय?

ब्रेन फॉग ही अधिकृत वैद्यकीय स्थिती नाही, परंतु जेव्हा तुम्हाला विचार करणे, समजणे किंवा लक्षात ठेवणे कठीण होते तेव्हा याचा संदर्भ येतो. हा त्रास अनियमित झोप, जास्त काम, ताण आणि इतर मानसिक आरोग्य समस्यांमुळे होऊ शकतो.

ब्रेन फॉग का होते?

अधिक ताण : सतत वाढणाऱ्या तणावामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाच्या संप्रेरकाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मेंदूचे कार्य कमी होऊ शकते.

अनियमित झोप : योग्य वेळी पुरेशी झोप न मिळाल्यानेही ब्रेन फॉग शकतो.

जास्त कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन : याच्या अतिसेवनामुळे ब्रेन फॉग देखील होऊ शकतो.

इतर कारणे : इतर आजार, औषधांचे दुष्परिणाम, जास्त साखरेचे सेवन, हार्मोनलचे असंतुलन हे देखील ब्रेन फॉक होण्याचे कारण असू शकते.

ब्रेन फॉग कसे टाळावे?

नियमित व्यायाम, योग्य आणि संतुलित आहार, पुरेशी झोप, ध्यान आणि योग यासारखे नैसर्गिक उपाय तुम्हाला ब्रेन फॉग टाळण्यास मदत करू शकतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या आरोग्यामध्ये गंभीर समस्या आहे, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. छोट्या-छोट्या गोष्टी विसरण्यामागील कारण स्पष्ट झाल्यानंतर यापुढे तुम्हाला देखील अशी समस्या जाणवल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच, वेळोवेळी आरोग्याची काळजी घेणे आणि योग्य जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/NSFfTJt Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुम्हालाही छोट्या-छोट्या गोष्टी विसरण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा, 'या' आजाराचं असू शकतं लक्षणhttps://ift.tt/gAPxcd7