Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट २२, २०२३ WIB
Last Updated 2023-08-21T23:48:08Z
careerLifeStyleResults

Health Tips : सकाळी रिकाम्या पोटी हिरवी कोथिंबीर चावून खा; 'या' गंभीर आजारांपासून नेहमी सुरक्षित राहाल

Advertisement

Coriander Leaves Health Benefits : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांवर मात करण्यासाठी डॉक्टर हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या भाज्यांच्या यादीत हिरव्या कोथिंबीरचंही (Coriander Leaves) नाव घेतलं जातं. हिरवीगारी दिसणारी कोथिंबीर केवळ पदार्थांची चव वाढवण्याचं काम करत नाही तर ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हिरव्या कोथिंबीरमध्ये ऊर्जा, कार्बोहायड्रेट, चरबी, आहारातील फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, जस्त, सेलेनियम, मॅंगनीज, सोडियम, फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, थायामिन, यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात.

इतकंच नाही तर कोथिंबीरमध्ये अँटीमायक्रोबियल, अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी असे गुणधर्मही आढळतात. सकाळी रिकाम्या पोटी हिरवी कोथिंबीर कच्ची खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

हिरवी कोथिंबीर खाण्याचे फायदे

1. हृदयरोगांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त : हिरवी कोथिंबीर हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीरातून अतिरिक्त सोडियम काढून टाकते. एवढेच नाही तर ते एलडीएल कोलेस्ट्रॉलची समस्याही दूर करू शकते. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर दररोज हिरवी कोथिंबीर खा.

2. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त : हिरवी कोथिंबीर मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणत्याही संजीवनी औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही. याच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरचे सेवन करू शकता.

3. रोगप्रतिकारशक्ती : कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी आपल्या आहारात कोथिंबीरचा समावेश करणं आवश्यक आहे. कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

4. सूज कमी करण्यासाठी उपयुक्त : हिरव्या कोथिंबीरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, म्हणजेच, याचे सेवन केल्याने शरीरातील सूज येण्याची समस्या कमी होते. जळजळ कधीकधी गंभीर रोगांना कारणीभूत ठरते. यामुळेच यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

तुम्हाला देखील अनेक आजारांपासून सुटका हवी असेल तर आजपासून आहारात हिरव्यागार कच्च्या कोथिंबीरचा समावेश करा. तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही समस्या जाणवणार नाहीत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/fRpUkbo Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सकाळी रिकाम्या पोटी हिरवी कोथिंबीर चावून खा; 'या' गंभीर आजारांपासून नेहमी सुरक्षित राहालhttps://ift.tt/K3wanE7