Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट २४, २०२३ WIB
Last Updated 2023-08-24T05:49:00Z
careerLifeStyleResults

Health Tips : तुम्हीही गुडघेदुखीच्या त्रासाने त्रस्त आहात? 'हे' घरगुती उपाय करून पाहा; काही दिवसांतच फरक जाणवेल

Advertisement

Knee Pain : वाढत्या वयानुसार गुडघेदुखीची समस्या वाढतेय. जगभरातील मोठ्या संख्येने लोक या वेदनांनी त्रस्त आहेत. मात्र, आजकाल लहान वयातच गुडघेदुखीचा त्रास होऊ लागला आहे. या दुखण्यामागे एक नाही तर अनेक कारणे असू शकतात. वाढतं वय, अन्नातील पोषक तत्वांची कमतरता किंवा कुठेतरी पडल्यामुळे होणारी वेदना यामुळे हा त्रास  होऊ शकतो. कधीकधी वेदना सामान्य असते, परंतु जेव्हा बऱ्याच काळापासून वेदना दूर होत नाही, तेव्हा समस्या मोठी होऊ शकते. म्हणूनच जेव्हा जेव्हा गुडघेदुखीचा त्रास होतो तेव्हा काही घरगुती उपाय करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. हे घरगुती उपाय कोणते ते जाणून घ्या.

हळद

आरोग्यासाठी रामबाण उपाय मानल्या जाणाऱ्या हळदीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. हळद त्याच्या दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे गुडघेदुखीपासून त्वरित आराम देऊ शकते. गरजेनुसार एक चमचा हळद पाण्यात टाकून पेस्ट बनवा आणि गुडघ्यांवर लावा. असे दिवसातून दोनदा केल्याने गुडघेदुखीपासून सुटका मिळते.

आलं

गुडघेदुखी दूर करण्यासाठीही आलं प्रभावी ठरू शकते. आल्यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म वेदनांपासून आराम मिळवून देतात. सांधेदुखीवरही आले अप्रतिम प्रभाव दाखवते. आल्याचे छोटे तुकडे गरम पाण्यात टाकून पाणी गाळून त्यात चवीनुसार मध आणि लिंबाचा रस टाका. हे पाणी रोज प्यायल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

कोरफड

औषधी गुणधर्माचा खजिना असलेला कोरफड गुडघेदुखी दूर करतो. एलोवेरा जेल लावल्याने वेदना कमी होतात. यामुळे गुडघ्यांची सूजही कमी होते. जर तुम्हाला हवे असेल तर कोरफड जेलमध्ये थोडी हळद मिसळा आणि वेदनादायक भागावर लावा. वेदना आणि सूज दूर होऊ शकते.

कापूर तेल

गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही कापूर तेल वापरू शकता. हे वेदनेपासून आराम देण्याचे काम करते. एक चमचा कापूर तेल घ्या आणि त्यात खोबरेल तेल मिसळा आणि चांगले गरम करा आणि तेल थंड झाल्यावर दिवसातून दोनदा गुडघ्यांना मालिश करा. त्याचा परिणाम काही वेळात दिसून येईल.

एप्सम मीठ

एप्सम मीठ गुडघेदुखीपासून मुक्त होण्यासाठी देखील चांगले काम करते. एप्सम मिठामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फेट आढळतात, जे वेदना कमी करण्यासाठी तसेच सूज दूर करण्यासाठी काम करतात. आंघोळीच्या पाण्यात एप्सम मीठ मिसळून वापरा. यामुळे रक्त प्रवाह सुधारेल आणि खूप आराम मिळेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/6ho5dRI Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुम्हीही गुडघेदुखीच्या त्रासाने त्रस्त आहात? 'हे' घरगुती उपाय करून पाहा; काही दिवसांतच फरक जाणवेलhttps://ift.tt/4cTH3tP