Advertisement

Health Tips : मॉर्निंग वॉक हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. जर तुम्ही रोज सकाळी काही पावले चालत असाल तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, मॉर्निंग वॉकची पद्धत परिपूर्ण असावी. जर तुम्ही सकाळी चुकीच्या मार्गाने चालत असाल तर त्यामुळे तुम्ही आजारी देखील होऊ शकता. तज्ज्ञांच्या मते, सकाळी चालण्याने स्नायू मजबूत, हाडे निरोगी, हृदय निरोगी आणि वजन नियंत्रित राहते. मात्र, त्याची पद्धत योग्य नसेल तर ती हानिकारकही ठरू शकते. मॉर्निंग वॉक करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते जाणून घेऊयात.

पोट भरून खाऊ नका

जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी जाता तेव्हा लक्षात ठेवा की काहीही जड पदार्थाचे सेवन करू नका. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. सकाळी लवकर काही खायचे असेल तर हलका आणि पौष्टिक आहार घ्या. फळे, दही यांसारख्या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर आहे. यामुळे ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहते.

पाणी पिण्यास विसरू नका

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यावर पाणी पिऊन बाहेर जा. त्यामुळे चालताना शरीरातील हायड्रेशन टिकून राहण्यास मदत होईल. सकाळी चालण्याआधी पाणी प्यायल्याने एनर्जी लेव्हल वाढते आणि शरीर सक्रिय राहते.

योग्य शूज निवडा

मॉर्निंग वॉक करताना तुमचे शूज योग्य असावेत. आरामदायक आणि फिटिंग वॉकिंग शूज निवडणे चांगले आहे. चालण्याचे शूज जेवढे आरामदायक आणि फिट असतील तेवढेच ते आरोग्यासाठी चांगले आहेत. नेहमी चांगले ग्रीप असलेले शूज निवडा. त्यामुळे चालताना त्रास होणार नाही.

वॉर्म अप करण्यास विसरू नका

मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी वॉर्म अप सर्वात महत्त्वाचे मानले जाते. यामुळे शरीर चालण्यासाठी तयार होते आणि स्नायू व्यवस्थित काम करू लागतात. वैद्यकशास्त्रानुसार, चालण्याआधी 5-10 मिनिटे वॉर्म अप आवश्यक आहे. यामुळे तुमचा मॉर्निंग वॉक चांगला होईल आणि आरोग्य सुरक्षित आणि निरोगी राहील. जर तुम्ही रोज सकाळी मॉर्निंग वॉक करताना या सवयी लावल्या तर तुमचे आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त राहील. त्यामुळे या सवयी फॉलो करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/dZ5YJQ9 Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुम्हाला मॉर्निंग वॉकची योग्य पद्धत माहित आहे का? चुकीच्या पद्धतीने चाललात तर 'हे' नुकसान होण्याची शक्यताhttps://ift.tt/k4jhm9g
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुम्हाला मॉर्निंग वॉकची योग्य पद्धत माहित आहे का? चुकीच्या पद्धतीने चाललात तर 'हे' नुकसान होण्याची शक्यताhttps://ift.tt/k4jhm9g