Advertisement

Oral Cancer : गेल्या काही वर्षांत तोंडाचा कर्करोग झपाट्याने पसरला आहे. अनेकजण आजकाल कर्करोगाचे शिकार झालेले दिसतात. तंबाखू, सिगारेट, गुटखा खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. तोंडाचा कॅन्सर झाल्यास व्यक्ती मृत्यूमुखीही पडू शकतो. मात्र त्याची सुरुवातीची लक्षणे आढळल्यास त्यावर उपचार शक्य आहेत. आजाराची सुरुवातीचे लक्षणं लवकरात लवकर लक्षात येणे महत्वाचे आहे. काही वेळेस या आजाराची लक्षणं लक्षात येत नाही आणि परिणामी हा आजार रौद्र रूप धारण करतो.

काय आहेत लक्षणं

- तोंडाचा कर्करोग झाल्यानंतर तोंडात गालाच्या आतल्या बाजूला फोड येतो. ज्याला आपण तोंड येणे असे देखील म्हणले जाते. त्याचबरोबर तोंडात इजा होणे, ओठ फाटणे आणि जखम सहजसाहजी न भरणे अशी सामान्य लक्षणे दिसायला लागतात.

- तोंडाचा कर्करोग होताना सुरूवातीस तोंडाच्या आतल्या बाजूला पांढरा फोड येतो. जर तोंडात बराच काळ पांढरा डाग, जखम, तोंड आलं असेल, तर तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे.

- त्याचबरोबर तोंडातून दुर्गंध येणे, आवाज बदलणे, आवाज बसणे, काही गिळण्यात त्रास होणे, जास्त लाळ किंवा रक्त येणे, ही देखील तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. यामध्ये जखमा, सूज, रक्तस्त्राव, जळजळ, तोंडात दुखणे अशी लक्षणे दिसतात.

- एक किंवा अधिक दातांमध्ये विनाकारण कमकुवतपणा येणे किंवा ते पडणे हे देखील कर्करोगाचे लक्षण असू शकते. तसंच जर दात काढला असेल आणि त्या जागचा खड्डा भरत नसेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. तोंडाच्या कर्करोगाचा उपचार शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपीसह अनेक प्रकारे केला जातो. शिवाय हे उपचार त्या व्यक्तीचे वय, आरोग्याची स्थिती आणि स्टेजवर अवलंबून असतात.

- हिरड्या, जीभ टॉन्सिल किंवा तोंडावर लाल आणि पांढरे डाग उठणे हे धोकादायक ठरु शकते. या स्थितीला ल्युकोप्लाकिया असे म्हणतात. बहुतेक ल्युकोप्लाकिया पॅच नॉन -कॅन्सरचे असतात. परंतु, बर्‍याच कर्करोगाचे हे लक्षणे असू शकते. जे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होऊ शकते.

- तोंडाच्या कॅन्सरचे वेळीच निदान आणि उपचार केले जाण्यासाठी सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचे असते.

- आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून, लवकरात लवकर उपचार करून घेऊन तोंडाच्या कॅन्सरपासून सुरक्षित राहता येऊ शकते.

- तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन करणाऱ्या व्यक्ती ज्यांना तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यांनी व्यसने थांबवावीत.

- तोंड, जीभ किंवा घशामध्ये काही असामान्यत्व आहे का हे पाहण्यासाठी नियमितपणे फुल टाईम स्पेशालिटी सिस्टिम असलेल्या रुग्णालयात तपासणी आणि स्क्रिनिंग्स करावे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/A7wHFRk Tips : आपल्याला उचकी का लागते? उचकी थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Oral Cancer : तोंडाच्या Cancerची लक्षणे कोणती? ती कशी ओळखायची? वाचा सविस्तरhttps://ift.tt/OArtc2m
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Oral Cancer : तोंडाच्या Cancerची लक्षणे कोणती? ती कशी ओळखायची? वाचा सविस्तरhttps://ift.tt/OArtc2m