Advertisement

<a href="https://ift.tt/jA2so4G Francis about LGBT : ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी एलजीबीटी समुदायाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे की, कॅथलिक चर्च LGBT समुदायासाठी खुले आहेत. यावेळी त्यांनी म्हटलं की, अध्यात्माच्या मार्गावर सर्वांच्या सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. पण, यासाठीचे दिलेले काही नियम पाळावे लागतील. पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं की, नियमानुसार LGBT समुदायाचे लोक काही विधींमध्ये भाग घेऊ शकत नाही, पण याचा अर्थ त्यांच्यावर बंदी आहे, असा होत नाही.

पोप फ्रान्सिस यांचं मोठं वक्तव्य

पोप फ्रान्सिस पोर्तुगालमध्ये आयोजित जागतिक युवा दिन कॅथोलिक महोत्सवात सहभागी झाले होते. पोर्तुगालहून रोमला परतत असताना पत्रकारांशी संवाद साधताना पोप फ्रान्सिस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एलजीबीटी समुदायाबाबत बोलताना ते म्हणाले की, कॅथलिक चर्चमध्ये एलजीबीटी समुदायाला परवानगी आहे. पण, त्यांना काही नियम पाळावे लागतील.

LGBT समुदायासाठी चर्च खुले पण...

पोप फ्रान्सिस यांननी म्हटलं की, चर्चमध्ये जीवन नियंत्रित करण्यासाठी काही नियम आहे आणि त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. पोर्तुगालच्या भेटीदरम्यान त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले की चर्च सर्वांसाठी, सर्वांसाठी खुले आहे, परंतु महिला आणि समलैंगिकांना इतरांपेक्षा जास्त अधिकार मिळत नाहीत हे विसंगत नाही का, असा प्रश्न एका पत्रकाराने पोप फ्रान्सिस यांना विचारला होता, त्यावर उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

काही विधींमध्ये सहभागी होता येणार नाही

पोप फ्रान्सिस म्हणाले की, 'नियमांनुसार समलैंगिक लोक चर्चच्या काही विधींमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. याचा अर्थ त्यांच्यावर बंदी आहे असं नाही. चर्चमधील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वत: च्या मार्गाने देवाचा सामना करावा लागतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान,समलिंगी जोडप्यांना चर्चमध्ये लग्न करण्याची परवानगी नाही.

पोप फ्रान्सिस यांच्याकडून अनेक सुधारणा

ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी एलजीबीटी समुदायासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. एलजीबीटी समुदायासाठी पोप फ्रान्सिस सतत प्रयत्‍न करत आहेत. पोप फ्रान्सिस यांनी गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अनेक सुधारणा केल्या आहेत. यामध्ये चर्चमध्ये महिलांना जबाबदारी आणि महत्त्वाची भूमिका देणे, हे महत्त्वाचं पाऊल आहे. याच पार्श्वभूमीवर व्हॅटिकन सिटीमधील उच्च पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संंबंधित इतर बातम्या :

'एलजीबीटी समूह ही समस्या नाही'; सरसंघचालक मोहन भागवतांकडून LGBT समुदायाचं समर्थन

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Pope Francis : चर्च LGBT समुदायासाठी खुले, पोप फ्रान्सिस यांचं मोठं वक्तव्य; पण पाळावी लागणार 'ही' अटhttps://ift.tt/Hfug9rE
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Pope Francis : चर्च LGBT समुदायासाठी खुले, पोप फ्रान्सिस यांचं मोठं वक्तव्य; पण पाळावी लागणार 'ही' अटhttps://ift.tt/Hfug9rE