Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३, ऑगस्ट ०४, २०२३ WIB
Last Updated 2023-08-03T23:50:22Z
careerLifeStyleResults

Skin Care Tips : पावसाळ्यात सेन्सेटिव्ह त्वचेची 'अशी' घ्या काळजी, फॉलो करा या 5 टिप्स

Advertisement

Skin Care Tips : पावसाळी हंगामात तेलकट, कोरड्या त्वचेपेक्षा जास्त आव्हाने सेन्सेटिव्ह स्किनसाठी असतात. पावसाळ्यात तुमची त्वचा नेहमीपेक्षा जास्त संवेदनशील बनते आणि हे प्रामुख्याने वाढलेली आर्द्रता आणि पर्यावरणीय घटकांमुळे होते. पण, योग्य स्किनकेअर रुटीन वापरल्याने तुम्हाला या अडथळ्यांवर मात करण्यात आणि निरोगी, तेजस्वी स्किन राखण्यात मदत होऊ शकते. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

संवेदनशील त्वचेसाठी लाईट क्लीन्सिंग

तुमच्या त्वचेवर जमा होणारे अतिरिक्त तेल, घाण आणि प्रदूषक काढून टाकण्यासाठी तुमची पावसाळी स्किनकेअर रुटीन हलक्या जेंटल क्लिन्झरने सुरू करा. सेटाफिल जेंटल स्किन क्लिंझरची निवड करा, ते विशेषत: संवेदनशील त्वचेसाठी डिझाइन केलेले आहे. हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले क्रीमी फॉर्म्युला अत्यावश्यक ओलावा काढून टाकल्याशिवाय अशुद्धता प्रभावीपणे काढून टाकते.

लाईटवेट मॉइश्चरायझेशन आणि हायड्रेशन

पावसाळ्यातही संवेदनशील त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी हायड्रेशन महत्त्वाचे आहे. त्वचेवरील पोर्स आणि ब्रेकआउट्स टाळण्यासाठी, हायड्रेशनचे परिपूर्ण संतुलन प्रदान करणारे हलके, तेलमुक्त मॉइश्चरायझर्स शोधा किंवा हायलुरोनिक ऍसिड किंवा ग्लिसरीनसारखे घटक असलेले मॉइश्चरायझर्स निवडा, जे आर्द्रता आकर्षित करतात आणि लॉक करतात.

सनस्क्रीन

निकारक अतिनील किरण तुमच्या संवेदनशील त्वचेपर्यंत सहज पोहोचू शकतात. हाय एसपीएफ असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरून अतिनील किरणोत्सर्गापासून स्वतःचे संरक्षण करा. दर दोन ते तीन तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावायचे लक्षात ठेवा, खासकरून जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर सनस्क्रिन लावूनचा बाहेर पडा.

टोनिंगसह अतिरिक्त तेल कमी करा

पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे त्वचेच्या समस्या अधिक होतात. अतिरिक्त तेलाचा सामना करण्यासाठी, तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये लाईट टोनरचा समावेश करा. विच हेझेल किंवा टी ट्री ऑईलसारखे नैसर्गिक घटक असलेले टोनर शोधा, जे त्यांच्या सेबम-संतुलन गुणधर्मांसाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी ओळखले जातात. अल्कोहोल असलेले टोनर टाळा, कारण ते संवेदनशील त्वचेला आणखी त्रास देऊ शकतात.

हायड्रेशन बूस्टरची शक्ती

हायड्रेशन बूस्टरच्या सामर्थ्याने पावसाळ्यात तुमची संवेदनशील त्वचा हायड्रेट करा. हायलूरोनिक ऍसिड, सिरॅमाइड्स किंवा व्हिटॅमिन ई सारख्या शक्तिशाली हायड्रेटिंग घटकांची उत्पादने पाहा. हे घटक ओलावा पातळी पुन्हा भरून, त्वचेच्या अडथळ्याचे कार्य बळकट करून आश्चर्यकारक कार्य करतात. ओलावा वाढवण्यासाठी आणि तुमच्या चेहऱ्याला इष्ट ग्लो देण्यासाठी तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये हायड्रेटिंग सीरम समाविष्ट करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/IirfChB Week : स्तनपानाशी संबंधित 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care Tips : पावसाळ्यात सेन्सेटिव्ह त्वचेची 'अशी' घ्या काळजी, फॉलो करा या 5 टिप्सhttps://ift.tt/ypOvoVX