Advertisement

मुंबई : झोप (Sleep) ही माणसाची मूलभूत गरज असून ती पूर्ण नाही झाली, तर अनेक आजार होण्याची शक्यता असते, असं डॉ. पुष्कर शिकारखाने यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं आहे. झोप ही माणसाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच, पुरेशी झोप घेणं हे प्रत्येकासाठी तितकचं गरजेचं आहे.

पण फक्त पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं नाही तर गाढ झोप लागणं देखील तितकचं महत्त्वाचं आहे. पण जर आपण पुरेशी झोप नाही घेतली किंवा आपल्याला गाढ झोप लागत नसेल तर याचे कोणते परिणाम शरीरावर होतात, हे एबीपी माझाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आम्ही डॉ. पुष्कर शिकारखाने यांच्याशी संवाद साधला. त्यांनी झोपेबाबत एबीपी माझाला अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिली आहे.

पुरेशी झोप घेणं गरजेचं

डॉ. पुष्कर शिकारखाने यांनी बोलतांना म्हटलं की, पुरेशी झोप घेणं हे जास्त गरजेचं आहे कारण आपलं कामाचं वेळापत्रक हे अत्यंत विचित्र असतं. त्यामुळे पुरेशी झोप नाही झाली तर त्याचा परिणाम आपल्या कामावर देखील होऊ शकतो. प्रत्येकाने 7 ते 9 तासांची झोप घेणं आवश्यक असतं. जर आपली झोप पुरेशी होत नसेल तर आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे पुरेशी आणि गाढ झोप घेणं हे तितकच गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. पुरेशी झोप नाही झाली तर मधूमेह आणि हृदयाच्या अनेक आजरांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया किंवा ओएसए हे झोपेचा त्रास होण्याचे प्रमुख कारणं आहेत. या आजारात झोपेत श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी देखील वारंवार कमी होते. यामुळे आपल्याला झोपमोड होण्याची शक्यता असते. हा त्रास असणाऱ्या लोकांना जास्त झोप लागणे, झोप न लागणे, दिवसा झोपाळल्यासारखे वाटणे, झोपेत घोरणे, झोपेत गुदमरणे, लघवी करण्यासाठी झोपेतून उठणे, झोपेनंतर ही ताजेतवाने न वाटणे, सकाळची डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे, एकाग्रता नसणे यांसारखी लक्षणं दिसून येतात.

यावर उपाय कोणते?

यासाठी स्लीप स्टडी करुन घेण्याचा सल्ला डॉ. पुष्कर शिकारखाने यांनी दिला आहे. स्लीप स्टडीमध्ये ही लक्षणं असणाऱ्या लोकांची झोपेची चाचणी केली जाते. त्यामुळे नेमका कोणता त्रास होत आहे? हे समजण्यास मदत होते. यासाठी झोपताना कायम सकारात्मक विचार करावे. तसेच, नियमितपणे 7 ते 9 तासांची झोप पूर्ण करावी. रात्रीचे जेवण लवकर करावे आणि झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी टीव्ही किंवा मोबाईल वापरण टाळण्याचा सल्ला देखील यावेळी तज्ज्ञांनी दिला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/DJ8tTFU Sleep : झोप नाही तर गाढ झोप घेणं आहे गरजेचं, गाढ झोपेचे नेमके फायदे कोणते?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Sleep Importance : 'झोप ही माणसाची मूलभूत गरज', काय आहे झोपेबाबत तज्ज्ञांचं मत?https://ift.tt/5EILOZq
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Sleep Importance : 'झोप ही माणसाची मूलभूत गरज', काय आहे झोपेबाबत तज्ज्ञांचं मत?https://ift.tt/5EILOZq