Advertisement

World Photography Day 2023 : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात फोटोचे महत्त्व खूप असते. एखाद्या गोष्टीची आठवण आपल्यासोबत कायमची ठेवायची असल्यास आपण त्याला कॅमेऱ्यात कैद करतो आणि मग काय जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी ती आठवण फोटोच्या रुपात आपल्यासोबत राहते. फोटोंचे हे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. तसे, फोटो प्रत्येकासाठी खास असतात कारण ते त्यांच्या आयुष्याशी संबंधित भूतकाळातील क्षण पुन्हा जिवंत करण्याची संधी देतात.

आजकाल सोशल मीडियाचे क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. कोणत्याही ठिकाणी आपण गेलो की पहिल्यांदा आपण त्या जागेचा फोटो काढतो आणि लगेच सोशल मीडियावर शेअर करतो. तुम्ही जर फोटोजेनिक असाल आणि तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांची सुंदर फोटो क्लिक करायला आवडत असतील तर तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही. कारण भारतातच अशी सुंदर ठिकाणे आहेत, जिथून तुम्ही सुंदर फोटो क्लिक करु शकता. <a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/C3b1L4s photography day निमित्त या खास ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

कोडाईकनाल, तामिळनाडू

तामिळनाडूमधील कोडाईकनाल हे पश्चिम घाटातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. दूरवर पसरलेल्या टेकड्या आणि आकाशाचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी डॉल्फिन नोजवर नक्की जा. येथे फिरण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.

मेघालय

उत्तर-पूर्व भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक म्हणजे मेघालय. या ठिकाणी नेहमीच पर्यटक असतील. जगात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीसाठी मेघालय प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला टेकड्या, दऱ्या, तलाव, गुहा आणि धबधब्यांची सुंदर दृश्ये पाहायला मिळतील. सोशल मीडियावर मित्रांसोबत काही फोटो शेअर करायची आहेत तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर

जम्मू आणि काश्मीरमध्ये तुम्ही खूप सुंदर फोटो क्लिक करु शकता, ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. बर्फाने सजलेले श्रीनगर ऑगस्टमध्ये खूप सुंदर दिसते. दाट हिरवीगार झाडी असलेले सरोवर आणि ढगांचे फोटो काढता येतात. येथे बोट राईड करा आणि सूर्य उगवण्यापूर्वी ढगांचे सुंदर चित्र क्लिक करण्यास विसरु नका.

लडाख

लडाख हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, जिथे एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा भेट देण्याची इच्छा होते. फोटोग्राफीसाठीही हे उत्तम ठिकाण आहे. हे संपूर्ण भारतातील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही येथे तलाव, नदी, पर्वत यांची सुंदर फोटो क्लिक करु शकता. हिवाळ्याच्या मोसमात तुम्ही या ठिकाणी जाण्याचा आनंद घेऊ शकता.

लोणावळा, महाराष्ट्र

लोणावळा हे एक उत्तम ठिकाण आहे, जिथे बहुतेक लोकांना वीकेंडला जायला आवडते. फोटोशूटसाठी हे उत्तम ठिकाण आहे. जेव्हाही तुम्ही इथे भेट द्याल तेव्हा सकाळी लवकर उठून सूर्याच्या पहिल्या किरणांचा सुंदर फोटो क्लिक करु शकता.

इतर महत्वाच्या बातम्या

<a style="color: #e03e2d;" href="https://ift.tt/QFAxJ0U Tips : सैंधव मिठाचं पाणी प्यायल्यास 'हे' 10 आजार होतील दूर; रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: World Photography Day 2023 : ही आहेत भारतातील पाच मोस्ट फोटोजेनिक ठिकाणं; फोटोग्राफी प्रेमींसाठी आहेत बेस्टhttps://ift.tt/7JqtVKs
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: World Photography Day 2023 : ही आहेत भारतातील पाच मोस्ट फोटोजेनिक ठिकाणं; फोटोग्राफी प्रेमींसाठी आहेत बेस्टhttps://ift.tt/7JqtVKs