Advertisement

<a href="https://ift.tt/gM78P3X Ram Mandir Design : अयोध्येमधील अवघ्या काही दिवसांमध्ये रामलल्ला विराजमान होणार आहे. जानेवारी 2024 मध्ये राम मंदिरात (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. डिसेंबरमध्ये मंदिराचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होईल. भव्य राम मंदिर 26 जानेवारीपासून सामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. राम मंदिराचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात आहे. राम मंदिरामध्ये प्रभू रामाच्या दोन मूर्त्या बसवण्यात येतील. यातील एक बालस्वरूपात असेल. राम मंदिरात अतिशय सुंदर असं बांधकाम केलं जात आहे.

26 जानेवारीपासून सामान्य भाविकांसाठी खुले

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून या भव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 15 ते 24 जानेवारी दरम्यान अयोध्येतील मंदिरातील गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम पार पडणार आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्रतिष्ठापना संपन्न होईल. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येईल.

अयोध्येतील राम मंदिराची खासियत

राम मंदिर भारतातील सर्वात मोठं मंदिर असेल. याची रचना आणि डिझाईनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरातन स्थापत्य कला अशा दोन्हींचा उत्तम नमुना असणार आहे. राम मंदिराची उंची 161 फूट असणार आहे. हे मंदिर 28000 वर्ग क्षेत्रावर बांधण्यात येत आहे. 380 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच गगनचुंबी असं मंदिराचं भव्य बांधकाम आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या बांधाकामात एक ग्रॅमही लोखंड वापरले गेले नाही. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता सूर्याची किरणे श्रीरामाच्या मूर्तीवर पडतील अशा पद्धतीने मंदिराची रचना करण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा दरवाजा

राम मंदिरामध्ये एकूण 42 दरवाजे बसवण्यात येणार आहेत. राम मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा वगळता इतर दरवाजे महाराष्ट्रातील सागवान लाकडापासून तयार करण्यात येत आहेत. तर, मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा दरवाजा बसवण्यात येणार आहे. या दरवाजावर सुंदर मोर, चक्र आणि फुलांचं नक्षीकाम करण्यात येईल. लाकडी दरवाज्यांवरही सुंदर नक्षीकाम करण्यात येणार आहे.

75 हजार भाविक दर्शन घेणार

अयोध्येतील राम मंदिरात दररोज सुमारे 75 हजार भाविक दर्शन घेऊ शकतील, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टने दिली आहे. 26 जानेवारीपासून राम मंदिर भक्तांसाठी खुले केले जाईल, त्यानंतर रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/FIfLchx Ram Mandir : 'या' मुहूर्तावर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, एका दिवशी 75 हजार भाविकांना दर्शन मिळणार; अयोध्या नगरी सज्ज

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर पडणार सूर्याची किरणे, 161 फूट उंच भव्य राम मंदिराची खासियत काय?https://ift.tt/oxYzALm
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर पडणार सूर्याची किरणे, 161 फूट उंच भव्य राम मंदिराची खासियत काय?https://ift.tt/oxYzALm