Advertisement

Suicide Data of India: शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील (Rajasthan) कोटा शहरातून एकापाठोपाठ एक आत्महत्येच्या (Suicide) घटना समोर येत आहेत. कोटा शहरात गेल्या काही महिन्यांत 23 मुलांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. एकंदरीत भारतातही दरवर्षी विविध कारणांमुळे बरेच लोक आत्महत्या करतात.

काही लोक फाशी घेऊन, तर काही विष घेऊन किंवा अन्य मार्ग स्वीकारत स्वत:चं जीवन संपवतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनेही (NCRB) आत्महत्येसंदर्भात अनेक डेटा शेअर केले आहेत, ज्यामध्ये लोक आत्महत्या का करत आहेत? आणि आत्महत्येसाठी ते कोणत्या पद्धती वापरत आहेत? हे सगळं सांगितलं आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार, भारतातील लोक कोणत्या प्रकारे आत्महत्या करतात? हे जाणून घेऊयात...

लोक स्वतःचं जीवन कसं संपवतात?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, बहुतेक लोक हे फाशी घेऊन आत्महत्या करतात. यानंतर अनेक जण हे विष घेऊन जीवन संपवतात, तर काही स्वत:ला जाळून, पाण्यात उडी घेऊन, ट्रेनसमोर जाऊन आत्महत्या करतात.

NCRB नुसार, 2020 मध्ये सर्वाधिक लोकांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. 2020 मध्ये 57 टक्के लोकांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. तर 25.1 टक्के लोकांनी विष घेऊन, 5.1 टक्के लोकांनी पाण्यात उडी घेऊन, 2.6 टक्के लोकांनी आत्मदहन करुन जीवन संपवलं आहे. 2021 मध्ये देखील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे आत्महत्या केल्या आहेत, त्याचा तपशील पाहुया...

फाशी : 57 टक्के ते 57.8 टक्के
विष पिऊन : 25 टक्के
झोपेच्या गोळ्या घेऊन : 0.6 टक्के ते 0.4 टक्के
पाण्यात उडी घेऊन : 5.1 टक्के ते 5.2 टक्के
जाळून (आत्मदहन) : 2.6 टक्के ते 3.0 टक्के
वरून उडी मारुन : 1.1 टक्के ते 1.2 टक्के
स्वत:ला दुखवून घेऊन : 0.3 टक्के
चालत्या गाडीखाली येऊन : 1.7 टक्के
विजेच्या तारेला स्पर्श करून : 0.4 टक्के

कोणत्या कारणांमुळे बहुतांश लोक करतात आत्महत्या?

2021 च्या NCRB च्या आकडेवारीनुसार, लोकांच्या आत्महत्या करण्यामागे विविध कारणं आहेत. काही लोक मानसिक ताणामुळे, तर काही वैयक्तिक किंवा घरगुती कारणांमुळे स्वत:चं जीवन संपवतात. लोकांनी आत्महत्या करण्यामागची काही कारणं जाणून घेऊया.

कौटुंबिक वादामुळे : 33.2 टक्के लोकांची आत्महत्या
आजारपणाला कंटाळून : 18.6 टक्के लोकांची आत्महत्या
दारुच्या व्यसनामुळे : 6.4 टक्के लोकांची आत्महत्या
विवाहाशी संबंधित समस्यांमुळे : 4.8 टक्के लोकांची आत्महत्या
प्रेम प्रकरणांमुळे : 4.6 टक्के लोकांची आत्महत्या
इतर कारणांमुळे : 9.2 टक्के लोकांची आत्महत्या
नपुंसकतेमुळे : 0.2 टक्के लोकांची आत्महत्या
सामाजिक प्रतिष्ठा गमावल्यामुळे : 0.5 टक्के लोकांची आत्महत्या
परीक्षेत नापास झाल्यामुळे : 1.0 टक्के लोकांची आत्महत्या
मालमत्तेच्या वादामुळे : 1.1 टक्के लोकांची आत्महत्या
गरिबीमुळे : 1.1 टक्के लोकांची आत्महत्या
जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे : 1.2 टक्के लोकांची आत्महत्या
करिअरच्या समस्यांमुळे : 1.6 टक्के लोकांची आत्महत्या
बेरोजगारीमुळे : 2.2 टक्के लोकांची आत्महत्या
दिवाळखोरीमुळे : 3.9 टक्के लोकांची आत्महत्या

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/wmyDVJo Video: सिनेमागृहातून 'The Nun 2' पाहून निघाले लोक; एग्झिट गेटवर उभं दिसलं खरंखुरं भूत, पाहा व्हिडीओ

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: झोपेच्या गोळ्या की फाशी? 'हा' डेटा सांगतो भारतातील बहुतांश लोक कशी करतात आत्महत्याhttps://ift.tt/LjqkBla
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: झोपेच्या गोळ्या की फाशी? 'हा' डेटा सांगतो भारतातील बहुतांश लोक कशी करतात आत्महत्याhttps://ift.tt/LjqkBla