Advertisement

कोलकाता : आताच्या कलियुगात प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि जीवनाचा सार समजून घेण्यासाठी आपण भगवत गीतेवर अवलंबून आहोत. भगवत गीतेच्या अमूल्य उपदेशाची कोणत्याही मौल्यवान वस्तूची तुलना होऊ शकत नाही. श्री कृष्ण उवाच श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक शब्दात सोन्याहून अधिक शुद्ध आणि हिर्‍यापेक्षा अधिक चमकदार असा संदेश आहे. एका व्यक्तीने हीच पवित्र भगवत गीता सोन्यानं लिहिली आहे.

23 कॅरेट सोन्यानं लिहिली गीता, हिरे, माणिक आणि चांदी वापरून

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील 87 वर्षीय डॉ. मंगल त्रिपाठी यांनी सोन्यानं भगवत गीता लिहीली आहे. त्यांनी फक्त सोनेच नाही तर, चांदी, माणिके आणि हिरे वापरून ही गीता लिहिली आहे. सोने, चांदी, हिरे आणि माणिके वापरून ही गीता लिहायला त्यांना तब्बल पाच दशकं म्हणजेच 50 वर्षे लागली.

'सुवर्णगीता' लिहायला लागली 50 वर्ष

मंगल त्रिपाठी यांनी आपले संपूर्ण आयुष्य ही गीता लिहिण्याच्या कामी लावलं. त्रिपाठी यांनी या कामासाठी कोणाचीही मदत घेतली नाही. या गीतेच्या मोबदल्यात त्यांना म्हणून मोठी रक्कमही मिळत होती. पण, त्यांनी कोट्यवधी रुपयांनाही त्यांनी सुवर्ण गीता विकली नाही. आठ अक्षरांची ही गीता पूर्णपणे चांदीवर लिहिली गेली आहे.

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना दिलं श्रेय

डॉ मंगल त्रिपाठी यांनी ही सुवर्ण गीता लिहिण्याचे संपूर्ण श्रेय भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना दिलं. त्रिपाठी यांनी सांगितलं की, त्यावेळी मी मुंबईत होतो. राकेश नावाचे एक ज्ञानी ऋषी होते. त्यांनी माझी मोरारजी देसाईंशी ओळख करून दिली. मोरारजी देसाईंनी मला गीतेवर काम करायला सांगितलं. यासाठी कोणाचीही मदत घेणार नाही, कोणापुढे झुकणार नाही, या संकल्पाने हे काम करा. यानंतर मी त्यांना सांगितलं की, तुम्ही मला मार्गदर्शन कराल का? यावर देसाई म्हणाले, नक्कीच आणि त्यांनी दिलेलं वचन पाळलं. त्यामुळे या गीतेचं श्रेय मी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना देऊ इच्छितो.

23 कॅरेट सोन्याची पानं

या गीतेत सुमारे 22 ब्लॉक्स आहेत. सुवर्ण गीता कृष्णाने वदली आहे. म्हणूनच 23 कॅरेट सोन्याची पानं बनवण्यात आली आणि त्यानंतर प्रत्येक अध्याय फॉइलचा वापर करुन लिहिला गेला आहे. ही सुवर्णगीता हजार पानांची आहे.

23 पत्रांवर 18 अध्याय

ही स्वर्णमयी गीता 23 पत्रांवर लिहिली गेली असून त्यामध्ये 18 अध्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर हजार पानांच्या या गीतेत 500 चित्रेदेखील आहेत.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Gita written By Gold : 'सुवर्णगीता'... 23 कॅरेट सोन्यानं लिहिली गीता, हिरे, माणिक आणि चांदी वापरून, पूर्ण करायला लागली 50 वर्षhttps://ift.tt/aKoLswN
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Gita written By Gold : 'सुवर्णगीता'... 23 कॅरेट सोन्यानं लिहिली गीता, हिरे, माणिक आणि चांदी वापरून, पूर्ण करायला लागली 50 वर्षhttps://ift.tt/aKoLswN