Advertisement

Hair Care Tips : आपले केस सुंदर, काळे आणि घनदाट असावेत असं प्रत्येकालाच वाटते. प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यात केसांची <a href="https://ift.tt/Qe30YXG Care Tips) भूमिका महत्त्वाची असते. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकालाच आपले केस जाड, काळे, चमकदार तसेच चांगले स्टाईल करायचे असतात. निरोगी आणि सुंदर केस असले की आत्मविश्वासात देखील वाढ होते तसेच दिवसभर आपला मूडही उत्साही राहतो.

आजकाल फॅशन इंडस्ट्रीतही सुंदर केसांवर भर दिला जातोय. त्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटी, मॉडेल्स असो वा सामान्य माणूस प्रत्येकजण आपल्या केसांची विशेष काळजी घेण्यावर भर देतात. आपले केस निरोगी आणि आकर्षक ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते महागड्या सलूनमध्ये जातात आणि केसांची निगा राखण्यासाठी महागडी उत्पादने वापरतात. पण काही छोट्या टिप्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस सुंदर आणि घनदाट बनवू शकता. अशा वेळी केसांना शॅम्पू करण्यापूर्वी काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे केस सुंदर आणि चमकदार बनवू शकता. कसे ते जाणून घ्या.

केसांना शॅम्पू करण्यापूर्वी केस नीट विंचरा

शॅम्पू करण्यापूर्वी केसांना नीट कंगवा करा जेणेकरून तुमच्या केसांमध्ये गुंता होणार नाही. असं केल्याने शॅम्पू केसांपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. शॅम्पू करण्याआधी कंगव्याने केस नीट विंचरले तर शॅम्पूदेखील केसांच्या मुळांपासून खोलवर तुमच्या केसांत पोहोचतो. तसेच, यामुळे तुमचे केसही तुटायचे थांबतील.

शॅम्पूला तेल लावण्यापूर्वी

शॅम्पू करण्यापूर्वी केसांना नीट तेल लावा. यामुळे तुमच्या टाळूवर नैसर्गिक तेलाचा थर तयार होतो ज्यामुळे केसांना आर्द्रता मिळते. हे शॅम्पूच्या कोणत्याही हानिकारक प्रभावापासून संरक्षण करते. शॅम्पू करण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने मसाज करा. यामुळे शॅम्पू केल्यानंतरही केस सॉफ्ट आणि चमकदार राहतील.

केसांना योग्य प्रमाणात शॅम्पू वापरा

केसांमध्ये योग्य प्रमाणात शॅम्पू वापरा. जास्त प्रमाणात शॅम्पू लावल्याने केस कमकुवत होतात. जेव्हाही तुम्ही शॅम्पू वापरता तेव्हा ते गोलाकार गतीने टाळूवर लावा. जेणेकरून केस जास्त गुंफणार नाहीत आणि तुमच्या केसांना शॅम्पूही नीट लागेल. ही पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर तुमचे केसही तुटणार आणि गळणार नाहीत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/y71TnCX Tips : मनःशांतीसाठी 'या' 4 गोष्टींपासून दूर राहा; स्वतःवर प्रेम असेल तर 'या' गोष्टी कोणत्याही किंमतीत करू नका

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Care Tips : सुंदर आणि घनदाट केस हवेत? तर, केस धुण्याआधी 15 मिनिटे 'हे' काम कराhttps://ift.tt/XUAJFkn
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Care Tips : सुंदर आणि घनदाट केस हवेत? तर, केस धुण्याआधी 15 मिनिटे 'हे' काम कराhttps://ift.tt/XUAJFkn