Advertisement
केमिकल बेस्ड शॅम्पूचा वापर, जास्त सूर्यप्रकाश, ताणतणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अशा अनेक गोष्टींमुळे तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींकडे आधी लक्ष देणं गरजेचं आहे. याशिवाय काही घरगुती उपायांनीही तुम्ही या समस्येपासून सुटका करू शकता. चला तर जाणून घेऊयात.
केळी
एक पिकलेलं केळं घ्या. त्यात दोन चमचे मध आणि 1/3 कप खोबरेल तेल घाला. हे मिश्रण साधारण अर्धा तास केसांवर ठेवा. नंतर केस स्वच्छ धुवा. केसांचा कोरडेपणा काही दिवसांत दूर होऊ लागेल.
मध
केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी केसांच्या लांबीनुसार एक किंवा अर्धा कप पाणी घ्या. त्यात एक चमचा मध घाला. नंतर केसांना लावा अर्ध्या तासानंतर सामान्य पाण्याने केस धुवा.
खोबरेल तेल
खोबरेल तेल कोरड्या केसांवर खूप प्रभावी आहे. हे तेल केवळ कोरडेपणाची समस्या दूर करत नाही तर केसांना खोलवर मॉइश्चरायझ करते आणि त्यांची लांबी देखील वाढवते. कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेल थोडे गरम करून केसांना लावा आणि किमान अर्धा तास ठेवा आणि नंतर शॅम्पू करा. हे आठवड्यातून 2-3 वेळा करा.
दही आणि कोरफड
दह्यामध्ये असलेले प्रोटीन केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि कोरफड केसांशी संबंधित बहुतेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. यासाठी कोरफडीचे जेल आणि दही प्रत्येकी एक चमचा घेऊन ते चांगले मिसळून मिश्रण बनवा. या मिश्रणाने टाळूला 5 मिनिटं मसाज करा, सुमारे 10 मिनिटे ठेवा आणि नंतर शॅम्पू करा.
सफरचंद व्हिनेगर
केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर दोन कप पाण्यात मिसळा. शॅम्पू केल्यानंतर, सफरचंद सायडर व्हिनेगरच्या पाण्याने केस धुवा, काही वेळ केसांवर राहू द्या आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/Po0tqrb Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Care Tips : कोरड्या केसांनी त्रस्त आहात? 'या' घरगुती उपायांनी तुमच्या केसांना सॉफ्ट आणि शायनिंग बनवाhttps://ift.tt/IfFn4A2
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Care Tips : कोरड्या केसांनी त्रस्त आहात? 'या' घरगुती उपायांनी तुमच्या केसांना सॉफ्ट आणि शायनिंग बनवाhttps://ift.tt/IfFn4A2