Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर १८, २०२३ WIB
Last Updated 2023-09-18T00:49:55Z
careerLifeStyleResults

Health Tips : हातांची त्वचा मऊ आणि चमकदार हवीय? तर 'ही' घरगुती पद्धत फॉलो करा; 10 दिवसांत फरक जाणवेल

Advertisement

Remedy For Hand Wrinkle : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत आपल्या शरीराकडे काळजीपूर्वक लक्ष देणं फारसं कोणाला जमत नाही. यामध्ये हातांची काळजी घेणं तर दूरच. पण सुंदर आणि सॉफ्ट हात असावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. वाढत्या वयाबरोबर हातावर सुरकुत्या येणं ही एक सामान्य बाब आहे, पण या सुरकुत्या आणि त्वचा कोरडी होणं टाळणंही गरजेचं आहे. अनेकदा आपण चेहऱ्याच्या त्वचेची विशेष काळजी घेतो पण हातांच्या त्वचेचा विसर पडतो. हातांची योग्य वेळी काळजी घेतली नाही तर वयानुसार सुरकुत्या वाढत जातात. चला तर मग जाणून घेऊयात काही सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांबद्दल जे हात मऊ, लवचिक आणि सुरकुत्या-मुक्त ठेवण्यास मदत करू शकतात.

खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल :

रोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल हाताला लावा. यामुळे हातांची त्वचा मऊ आणि चमकदार राहते. खोबरेल तेल आणि बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे हातांच्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. यामध्ये असलेले चरबीयुक्त घटक हातांच्या त्वचेला आर्द्रता देतात आणि ते हायड्रेटेड ठेवतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी हातांना खोबरेल किंवा बदामाचे तेल लावल्याने त्वचेचे पोषण होते आणि ती मऊ आणि चमकदार राहते.

कोमट पाण्याने आणि साखरेने हात धुवा

आठवड्यातून 2-3 वेळा कोमट पाणी आणि साखरेने हात धुवा. साखर नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि मृत त्वचा काढून टाकते.

कोरफड जेल लावा

हातांवर कोरफड जेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात आणि हात मऊ राहतात. कोरफडमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यात असलेले एन्झाइम मृत त्वचा काढून टाकतात आणि नवीन त्वचेच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात.

बेसन आणि लिंबूचा वापर करा

आठवड्यातून एकदा बेसन आणि लिंबाच्या मिश्रणाने हातांना मसाज करा. बेसनामध्ये व्हिटॅमिन B6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळते जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. ते त्वचेला  मऊ ठेवते. हे उपाय जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/dYFpHlj Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : हातांची त्वचा मऊ आणि चमकदार हवीय? तर 'ही' घरगुती पद्धत फॉलो करा; 10 दिवसांत फरक जाणवेलhttps://ift.tt/zwcAROH