Advertisement

Diabetes Control : आजच्या काळात मधुमेह हा अतिशय सामान्य आजार झाला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या आजाराला बळी पडतोय. मधुमेहात विशेष काळजी घ्यावी लागते ती आहाराची. कारण तुम्ही जे खाता-पिता त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होतो. यासाठी खाण्यापिण्याच्या निवडीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, 90% मधुमेही रुग्णांना फक्त त्यांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी सुधारून हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा हे समजून घेऊयात.

पालक

पालक ही मधुमेही रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर भाजी आहे. पालकामध्ये अनेक गुणधर्म आहेत जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. पालकमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते ज्यामुळे ते हळूहळू ग्लुकोज शोषून घेते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पालकामध्ये क्रोमियम आढळते जे इन्सुलिन कमी करण्यास मदत करते. पालकामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.

ब्रोकोली

ब्रोकोली ही मधुमेही रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर भाजी मानली जाते. यामध्ये क्रोमियम नावाचे खनिज आढळते जे इंसुलिनचे कार्य सुधारण्यास मदत करते. ब्रोकोलीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते जे पचन सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

मेथी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी खूप फायदेशीर आहे. मेथीमध्ये काही गुणधर्म आहेत जे मधुमेहाच्या उपचारात मदत करतात. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात विरघळणारे फायबर असते जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

गाजर

गाजर ही मधुमेही रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर भाजी आहे. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. गाजरमध्ये क्रोमियम आढळते ज्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते. गाजरांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, त्यामुळे ते रक्तातील साखरेचे प्रमाण रोखते.

कारलं

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं खूप फायदेशीर आहे. कारल्यामध्ये असलेले काही गुणधर्म मधुमेहामध्ये फायदेशीर असतात. कारल्याच्या रसामध्ये रक्तातील साखर कमी करण्याचे गुणधर्म असतात. कारल्याचा रस नियमित प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/apfH4gY Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : मधुमेही रुग्णांनी 'या' 5 भाज्यांचा आहारात समावेश करावा; रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहीलhttps://ift.tt/PJ26xYl
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : मधुमेही रुग्णांनी 'या' 5 भाज्यांचा आहारात समावेश करावा; रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहीलhttps://ift.tt/PJ26xYl